Karan kundra: असं काय केलं करणने की नेटकऱ्यांनी त्यांची लाजच काढली?

'अखियाँ' नावाचा म्युझिक व्हिडिओमुळे होतोय जोरदार ट्रोल...
Karan kundra
Riva Arora
Karan kundra Riva Arora esakal

बिग बॉस 15  नतंर प्रसिद्धिच्या झोतात आलेला करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे कपल सध्या जोरदार चर्चेत असतात. हि जोडी कुठेही गेली तरी पापाराझींच्या नजरेतुन सुटत नाही.त्यातच त्यांच्या लग्नांच्या चर्चांनाही उधान आले आहे. हि दोघ रोमॉटिक गाण्याच्या अल्बममध्ये दिसतात. मात्र करण त्याच्या अशाच एका व्हिडिओमुळे तो ट्रोल होत आहे. यावेळी नेटकऱ्यांनी त्यांची अक्षरश: लाजच काढली आहे.

Karan kundra
Riva Arora
Video :करण आणि पुनम पांडेचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले,'घरी बायको...'

त्यांची लाज काढण्याच कारण म्हणजे एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करणचा अलिकडेच एक 'अखियाँ' नावाचा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला त्यानंतर गाण्याच्या प्रमोशनसाठी तो रीवा अरोरासोबत दिसतो आहे. या शोर्ट व्हिडिओत ती तिच्या बॉयफ्रेंडला अंधारात ठेवुन करणसोबत रोमान्स करतांना  दिवसतेय. रिवाही केवळ १२ वर्षांची आहे आणि करण हा ३८ वर्षांचा आहे. त्यांच्या या व्हिडिओमुळे तो जोरदार ट्रोल होत आहे. नेटकरी त्याच्यावर संतापले आहेत.

यावर करणला नेटकरी म्हणताय, 'तुला लाज वाटायला हवी ती तुझ्या मुलीच्या वयाची आहे'. 'ती लहान मुलगी आहे'. तर काहिंनी रियाच्या आई वडिलानांच धारेवर धरलं आहे. पैशांसाठी मुलीकडून काहीही करुन घ्यायला लाज नाही वाटत का ? रिवा अरोराने वयाने मोठे दिसण्यासाठी तिने ग्रोथ हारर्मोन तर इंजेक्ट केलेले नाही ना असा सवालही उपस्थित केला आहे. लोक रिवा अरोराचं वय आणि तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यात रिवाच्या पालकांची चुकी असल्याचं सांगितलयं. युजर्सचं म्हणणं आहे की रीवा अजूनही लहान आहे आणि तिला अशा प्रकारे ऑनस्क्रीन लैंगिक किंवा रोमँटिक भूमिकांमध्ये दाखवणं  अत्यंत चुकिच आहे

Karan kundra
Riva Arora
Video: बॉलिवूडचे कलाकारही किरीट सोमय्यांच्या डान्सपुढे फिके...

रीवा अरोराचे सोशल मिडियावर 8  मिलीअनहुन अधिक फॉलोवर्स आहे. ती विविध चित्रपटांमध्येही दिसली आहे. रीवा अरोरा विकी कौशल स्टारर 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' आणि जान्हवी कपूरच्या 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या चित्रपटात दिसली होती. रीवा 'रॉकस्टार' आणि 'हसीना पारकर' सारख्या चित्रपटातही दिसली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com