सुशांतसिंग राजपूतची बहीण श्वेतासिंग कीर्तीकडून रियाचं पितळ उघड, स्क्रीनशॉट केला व्हायरल

संतोष भिंगार्डे
Sunday, 30 August 2020

नुकतेच सुशांतसिंग राजपूतची बहीण श्वेतासिंग कीर्ती हिने व्हॉट्स अॅप चॅटचे काही स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत ज्या चॅटमध्ये ड्रग्सबद्दल चर्चा होत आहे.

मुंबई ः  सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने तपास सुरू करून जवळजवळ आठवडा झाला आहे. यात ईडीच्या तपासणीत ड्रग्सचा मुद्दा उघडकीस आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) देखील या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. नुकतेच सुशांतसिंग राजपूतची बहीण श्वेतासिंग कीर्ती हिने व्हॉट्स अॅप चॅटचे काही स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत ज्या चॅटमध्ये ड्रग्सबद्दल चर्चा होत आहे.

काँग्रेसच्या आरोपानंतर संदीप सिंहची चौकशी होणार?, गृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

    एनआयएफडब्ल्यू असे या व्हॉट्स अॅप ग्रुपचे नाव आहे. या ग्रुपमध्ये आयुष एसएसआर, आनंदी एसएसआर, सिद्धार्थ पिठानी एसएसआर, शोविक, सॅम्युअल मिरांडा, रिया चक्रवर्ती आणि इतर काही जणांचा समावेश आहे. यात प्रत्येक जण ड्रग्ज आणि सिगारेट रोलविषयी बोलत आहे. या गप्पांमध्ये वॉटरस्टोन रिसॉर्टबद्दलही बोलले जात आहे. तसेच या ग्रुपमध्ये ड्रग्जचा फोटोही शेअर केला गेला आहे. हे ग्रुप चॅट जुलै 2019 चे आहे. या ग्रुपवर 27 ऑगस्ट 2019ला ड्रग्जचा फोटोही पाठविण्यात आला होता. तसेच रियाने तिच्याकडे डूबी हवे असल्याचेही या चॅटमध्ये सांगितले आहे. डूबी ही एक प्रकारची गांजाची सिगारेट आहे.

सुशांतच्या बँक अकाऊंटमधल्या ७० कोटींचा असा झाला व्यवहार, वाचा सविस्तर

     श्वेतासिंग कीर्ती हिने या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले, "काय चालले आहे, रिया चक्रवर्ती हिने लिहिले आहे की डूबीची गरज आहे. आयुष एसएसआरने रोलिंग असे लिहिले. त्यावर सिद्धार्थ पिठानी म्हणाला मिरांडा येथे आहे. या चॅटमध्ये दुसरी एक व्यक्ती लिहिते की ज्या दिवसासाठी वाॅटरस्टोन रिसॉर्ट बुक केले होते, ते आता रद्द झाले आहे. रिया या सदस्याला लिफ्टचा दरवाजा लॉक करण्यास सांगते. रिया म्हणाली, सुशला एक टँग पाठवा.  रियाने पुढे विचारले की आपल्याकडे डूबी आहे का ? मग त्यावर उत्तर येते की, मी तपासत आहे, रोल करून घेऊन येतो.  त्यावर सॅम्युअल मिरांडाने या ग्रुपवर ब्लूबेरी कुश या ड्रग्जचा फोटो पाठवला आणि तो म्हणाला की, हे कसं आहे ? त्यावर त्याला मग उत्तर मिळालं- व्वा.

रियाच्या `त्या` वक्तव्याची शेखर सुमनने उडवली खिल्ली - 

     सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआय रिया चक्रवर्ती यांची चौकशी करत आहे. सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानी याचीही सीबीआयने चौकशी केली आहे. सुशांत प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ड्रग्स कनेक्शनची सखोल चौकशी करत आहे. आतापर्यंत या प्रकरणात केपीएस मल्होत्रा यांच्या नेतृत्वात 4 ड्रग पेडर्सची चौकशी करण्यात आली. .

------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Riyas brass exposed by Sushant Singh Rajputs sister Shweta Singh Kirti, screenshot goes viral