आरजेनं प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला लाइव्ह रेडिओमध्ये केलं प्रपोज | Bollywood | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरजेनं प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला लाइव्ह रेडिओमध्ये केलं प्रपोज

आरजेनं प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला लाइव्ह रेडिओमध्ये केलं प्रपोज

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'इश्क विश्क', 'विवाह', 'मस्ती' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री अमृता रावची Amrita Rao लव्हस्टोरी फार क्वचित लोकांना माहित असेल. अमृता तिच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी व्यक्त होत नाही. अमृताने रेडिओ जॉकी अनमोल सूदशी RJ Anmol लग्न केलं. अनमोलने अमृताला कसं प्रपोज केलं, याबद्दलचा व्हिडीओ त्यांनी नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 'कपल ऑफ थिंग्स' या शोमध्ये त्यांनी याबद्दल सांगितलं होतं. आरजे अनमोलने अमृताच्या आवडीचं गाणं लावत लाइव्ह रेडिओवर तिला प्रपोज केलं होतं.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये अमृताने प्रपोजलची गोष्ट सांगितली. शूटिंग संपल्यानंतर घरी परतत असताना अमृता आरजे अनमोलचा शो ऐकत होती. "आम्ही चांगले मित्र होतो, पण त्यादिवशी असं वाटलं की आज मेसेज केला तर काही वेगळं तर नाही ना वाटणार? अखेर मी त्याला मेसेज केला की मी त्याचा शो ऐकत आहे", असं अमृता म्हणाली. अमृताने शो ऐकत असल्याचं सांगितल्यानंतर अनमोलने तिला पुढील पाच मिनिटांसाठी तो शो ऐकण्याची विनंती केली. "मला तेव्हाच वाटलं की काहीतरी गडबड नक्की आहे", असं अमृताने सांगितलं. तर अनमोल म्हणाला, "मुझे लगा गरम है लोहा, मार दो हतोडा."

हेही वाचा: आर्यनचा बॉडीगार्ड म्हणून शाहरुखने केली 'या' विश्वासू व्यक्तीची निवड

अनमोलने अमृताचं आवडतं गाणं 'चांदनी रात मे' रेडिओवर लावलं होतं. "आज मी माझ्या मनातली गोष्ट तिला सांगणार आहे, जी आता माझा शो ऐकत आहे, असं म्हणून मी तिला लाइव्ह रेडिओमध्ये प्रपोज केलं. तुलासुद्धा माझ्याबद्दल प्रेमभावना असतील तर मला कॉल कर असं मी तिला सांगितलं होतं", असं अनमोल म्हणाला. त्या प्रसंगाची आठवण सांगताना अमृता म्हणाली, "त्याने मला खरंच लाइव्ह रेडिओवर प्रपोज केलं होतं आणि संपूर्ण शहर ऐकत होतं."

अमृता आणि अनमोल यांनी २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमृताने मुलाला जन्म दिला. या दोघांनी मुलाचं नाव वीर असं ठेवलं.

loading image
go to top