
'रोडीज' फेम रणविजय दुसऱ्यांदा झाला बाबा
रोडीज, स्प्लिट्सव्हिला यांसारख्या शोचे सूत्रसंचालन करणारा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार रणविजय सिंग (rannvijay singha) आणि त्याची पत्नी प्रियांकाला (prianka) नुकतेच पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. रणविजय आणि प्रियांकाच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना चार वर्षांची कायनात ही मुलगी आहे. रणविजयने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांना मुलगा झाल्याची आनंदाची बातमी सांगितली. (roadies fame rannvijay singha and wife prianka singha welcome second child pvk99)
रणविजयने एका लहान जर्सिचा आणि लाल शूजचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिले, 'सतनाम वाहेगुरू'. अनेक कलाकारांनी रणविजयच्या या फोटोला कमेंट करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री नेहा धुपियाने कमेंट केली, 'ही खूप आनंदाची बातमी आहे. रणविजय, प्रियांका आणि कायनातला मनापासून शुभेच्छा.' तसेच गौहर खान, प्रिंस नरूला, दिव्या अगरवाल, वरूण सूद या सेलिब्रिटींनीदेखील रणविजय आणि प्रियांकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोना काळात मूल जन्माला घालणं किती कठीण असतं याबाबत एका मुलाखतीत रणविजय व्यक्त झाला होता. "कोरोना महामारीच्या काळात मूल जन्माला घालणं खूप चिंताजनक आहे. जास्तीत जास्त काळजीपूर्वक राहणं, हेच आपल्या हातात आहे. कठीण गोष्ट म्हणजे मी आणि माझी मुलगी लंडनमध्ये आहेत आणि मी इथे आहे. पण मी लवकरच त्यांच्याकडे जाईन", असं तो 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता.