esakal | सोनालीला पुण्यात करावा लागला होता वर्णभेदाचा सामना
sakal

बोलून बातमी शोधा

Sonali Kulkarni

सोनालीला पुण्यात करावा लागला होता वर्णभेदाचा सामना

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला Sonali Kulkarni वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. हा कटू अनुभव सोनालीने एका मुलाखतीत सांगितला. 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने पुण्यात अनुभवलेल्या वर्णभेदाचा प्रसंग सांगितला. 'बॉलिवूडमध्ये आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठी परदेशात प्रवास करतानाही तिथेही मला अनेकांनी प्रोत्साहन दिलं. मात्र पुण्यात मला वर्णभेदाचा सामना करावा लागला', असं तिने सांगितलं. अभिनेते गिरीश कर्नाड Girish Karnad यांना भेटण्यासाठी ती पुण्याला गेली होती. त्यावेळी 'काळ्या मुली कॅमेरावर चांगल्या दिसत नाहीत', असं एका महिलेनं सोनालीला बोलून दाखवलं होतं. (sonali kulkarni on facing colourism says i was told dark girls do not look good on camera slv92)

पुण्यात सोनाली एका ऑडिशनसाठी गेली होती. तिथे आणखी एक मुलगी तिच्या आईसोबत आली होती. त्या महिलेनं सोनालीला प्रश्न विचारला, "तू इथे का आलीस?" त्यावर सोनालीने गिरीश कर्नाड सरांना भेटण्यासाठी आल्याचं सांगितलं. त्यावर संबंधित महिला म्हणाली, "पण तू तुझा चेहरा आरशात पाहिलास का? काळ्या मुली कॅमेरावर चांगल्या दिसत नाहीत." हे ऐकून सोनालीला फार वाईट वाटलं होतं. "१५-२० मिनिटांनंतर मी गिरीश कर्नाड सरांना भेटले. त्यांनी माझ्यासोबत भरभरून गप्पा मारल्या. माझं कौतुक केलं", असं ती पुढे म्हणाली.

हेही वाचा: अंतर्वस्त्रांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीचं सडेतोड उत्तर

चित्रपटसृष्टीत जवळपास ३० वर्षांपासून काम करणारी सोनाली म्हणते, "यश किंवा अपयश या गोष्टी फारशा महत्त्वाच्या नसतात. मी जिथे आहे, तिथे मला कृतज्ञ राहायला आवडतं आणि आयुष्याचा मनमुराद आनंद लुटायला आवडतं." गिरीश कर्नाड दिग्दर्शित 'चेलुवी' या कन्नड चित्रपटातून सोनालीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. सोनालीने मराठी, गुजराती, कन्नड, हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.

loading image