esakal | 'आयर्न मॅनच्या' वडिलांचं निधन, 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
sakal

बोलून बातमी शोधा

robert downey jr and robert downey sr

'आयर्न मॅनच्या' वडिलांचं निधन, 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - हॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर (robert downey jr) यांच्या वडिलांचे रॉबर्ट डाऊनी सिनिअर (robert downey sr) यांचे निधन झाले (passed away) आहे. ज्युनिअर रॉबर्ट यानं सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत ही माहिती दिली आहे. रॉबर्ट यांच्या जाण्यानं हॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून एका मानसिक आजारानं त्रस्त होते. त्यावर उपचार घेत असतानाच 85 वर्षांच्या रॉबर्ट डाऊनी सिनिअर यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या जाण्याचे वृत्त कळताच हॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. (robert downey sr veteran filmmaker and father of robert downey jr dies at 85)

रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर याने आपल्या इंस्टाग्रामवरुन वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांच्या वडिलांच्या निधनाचे वृत्त कळताच रॉबर्टच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावरुन आधार देण्यास सुरुवात केली आहे. त्यानं सांगितलं, मंगळवारी माझ्या वडिलांचे झोपेतच निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून पार्किसन्सच्या आजारानं त्रस्त होते. त्याचा त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. या आजारावर ते उपचारही घेत होते. त्यांच्या जाण्यानं मला अतीव वेदना झाल्या आहेत. ते माझ्यासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

1936 मध्ये न्युयॉर्क शहरात रॉबर्ट डाऊनी सिनिअर यांचा जन्म झाला होता. पहिल्यांदा त्यांचे नाव रॉबर्ट एलियास ज्युनिअर असे होते. ते ज्यावेळी सैन्यात भरती झाले तेव्हा त्यांनी आपले नाव बदलले. त्यानंतर त्यांनी आपल्या सावत्र वडिलांचे नाव ठेवले. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते आपल्या बहिणीसोबत राहत होते. मोठ्या योगायोगानं ते चित्रपटाच्या क्षेत्रात आले.

हेही वाचा: आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘स्वमान से’ ची निवड

फिल्ममेकर रॉबर्ट डाऊनी सिनिअर यांनी 2005 मध्ये रिटर्न हाऊस नावाचा माहितीपट दिग्दर्शित केला होता. तो त्यांचा शेवटचा माहितीपट होता. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. फिलाडेल्फिया पार्कवर आधारित हा माहितीपट होता. तो त्याच्या वेगळेपणासाठी प्रेक्षकांसाठी कौतूकाचा विषय होता. याशिवाय त्यांनी टू लिव एंड डाय इन एलए मध्ये वेगवेगळ्या भूमिकाही साकारल्या होत्या.

loading image