esakal | आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘स्वमान से’ ची निवड
sakal

बोलून बातमी शोधा

short film 'Swaman Se'

आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘स्वमान से’ ची निवड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे, कॅलिफोर्निया वूमन्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘स्वमान से’ या लघुपटाची निवड झाली असून, २५ जुलैला लॉस एंजलिसमध्ये तो दाखवला जाणार असल्याची माहिती लघुपटाच्या लेखक, निर्मात्या आणि दिग्दर्शक दीप्ती घाटगे यांनी दिली.(short film 'Swaman Se' selected at the International Festival)

टोकियो इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, व्हॅन्कोव्हर इनडिपेन्डंट फिल्म फेस्टिव्हल आणि गोल्डन शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्येही या लघुपटाची निवड झाल्याचेही घाडगे यांनी सांगितले. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची व्यथा या लघुपटात मांडण्यात आली आहे. अत्याचाराबाबत समाजाला माहिती व्हावी आणि त्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, हा या लघुपटामागील निर्मितीचा उद्देश असल्याचे घाडगे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: तापसीच्या आईवडिलांना सतावतेय तिच्या लग्नाची चिंता; "कोणाशीही लग्न कर पण.."

एकट्या राहणाऱ्या महिलांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव होण्यासाठी या लघुपटाची मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महिलांवर अत्याचार करून निंदनीय कृत्य करणाऱ्यांचा खरा चेहरा पुढे आणण्यासाठी लघुपटाची निर्मिती केली आहे. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. महिलांवरील अत्याचाराबाबत लघुपटात मांडणी केली असली तरी तो दाखविणे हा मुख्य उद्देश नाही. त्यावर काय उपाययोजना असू शकतात, याची माहिती या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केल्याचेही घाडगे यांनी सांगितले.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी केलं 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'च्या टीमचं कौतुक

loading image