गेली 4 वर्ष आर.माधवनची कमाई का होती बंद? कारण सांगत केला मोठा खुलासा R.Madhavan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

R Madhavan

गेली 4 वर्ष आर.माधवनची कमाई का होती बंद? कारण सांगत केला मोठा खुलासा

अभिनेता आर माधवन(R.Madhavan) सध्या भलताच चर्चेत आहे. अर्थात तो एक उत्तम अभिनेता आहे हे त्यानं त्याच्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून दाखवून दिलंच आहे पण आता एक दिग्दर्शक म्हणूनही त्याचं नाव थेट यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मोठ्या सन्मानानं घेतलं जात आहे. त्याच्या 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट'चा प्रीमियर १९ मे रोजी ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडला. या सिनेमाला आर.माधवननं लिहिलं आहे,दिग्दर्शित केलं आहे आणि त्याची निर्मितीही त्यानं केली आहे. या सिनेमाचं स्क्रिनिंग कान्समध्ये पार पडल्यानंतर आर माधवन आणि त्याच्या कलाकृतीचं,टीमचं तब्बल १० मिनिटं उपस्थित मान्यवर अन् प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांच्या गडगडाटात कौतूक केलं. सिनेमाची खूप प्रशंसा देखील करण्यात आली.

हेही वाचा: Divorce नंतर सीमा खाननं बदलली ओळख; इन्स्टाग्रामवर नव्या नावाची चर्चा

हा सिनेमा आर.माधवनच्या संपू्र्ण करिअरमधला सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. आता हा सर्वसामान्य प्रेक्षकांना किती पसंत येतोय याबाबतीत मात्र माधवन सध्या मनात भीती बाळगून आहे. एका मुलाखतीत आर.माधवननं खुलासा केला आहे की,''गेल्या चार वर्षात त्यानं एकही पैसा कमावलेला नाही''. यासंदर्भात त्यानं मोठा खुलासा केला आहे. आर.माधवननं त्याच्या या नवीन सिनेमाविषयी मनात भीती असल्याचं सांगितलं आहे. हा सिनेमा किती कमाई करेल याविषयीचं टेन्शन सध्या आर.माधवनच्या मनात आहे. दोन वर्ष कोरानामध्ये गेली आणि त्याच्या आधीची दोन वर्ष 'रॉकेट्री-द नंबी इफेक्ट' बनवण्यात गेली. म्हणजे या चार वर्षात मी काहीच कमवून घरी आणलं नसल्याचं आर.माधवननं म्हटलं आहे.

हेही वाचा: कंगनाच्या ताफ्यात आली महागडी Mercedes Maybach, किंमत ऐकून उंचावतील भुवया

माधवनच्या मते,''ओटीटीनं मला या काळात त्याला आधार दिला आणि संकट काळाला तारुन नेलं. याव्यतिरिक्त कुठलाच सिनेमा त्यानं केला नाही ज्यातून मोठी कमाई होईल. तो म्हणाला,मी विक्रम वेधा सिनेमा केला. याव्यतिरिक्त मी Decoupled वेब सीरिज मध्ये काम केलं आहे,बाकी काहीच केलं नाही. आणि म्हणून आता या आगामी सिनेमाविषयी,त्याला प्रतिसाद कसा मिळेल,त्याची कमाई काय होईल याविषयी मनात भीती आहे''. या मुलाखतीत माधवननं आपली पत्नी सरिताचे देखील धन्यवाद मानले आहेत. माझी पत्नी त्या कठीण काळात माझा मोठा आधार होती.

हेही वाचा: विजय-समंथाचा 'लीपलॉक' अन् 'इंटिमेट' सीन; 'Kushi' प्रदर्शनाआधीच चर्चेत

'रॉकेट्री-द नांबी इफेक्ट' सिनेमात आर.माधवननं डॉ.नंबी नारायणनची भूमिका साकारली आहे. हा एक बायोग्राफिकल ड्रामा आहे,जो भारतीय शास्त्रज्ञ आणि एरोस्पेस इंजीनियर नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. डॉक्टर नंबी नारायणनना एका खोट्या आरोपात फसवलं गेलं होतं. या सिनेमात शाहरुख खान कॅमियो करताना दिसणार आहे. हिंदी,तामिळ आणि इंग्रजी भाषेव्यतिरिक्त हा सिनेमा तेलुगु,मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये देखील प्रदर्शित केला जाणार आहे.

Web Title: Rocketry The Nambi Effect Director R Madhavan Revelas That He Hasnt Earned Anything In The Last Four

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top