
विजय-समंथाचा 'लीपलॉक' अन् 'इंटिमेट' सीन; 'Kushi' प्रदर्शनाआधीच चर्चेत
समंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) आणि विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) हे दोघेदी दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध स्टार्स. लवकरच हे दोघे साऊथच्या 'कुशी' सिनेमात आपल्याला एकत्र दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या टायटलची घोषणा निर्मात्यांतर्फे करण्यात आली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन शिवा निर्वाणा करीत आहे. निर्मात्यांनी प्रेक्षकांना टायटलची घोषणा करताना एक वचन दिलंय की सिनेमा पाहताना एकामागून एक सरप्राइज पहायला मिळेल. यानंतर आता लगेचच बातमी कानावर पडतेय की या सिनेमात समंथा रुथ प्रभु आणि विजय देवरकोंडा मध्ये अनेक 'लीप-लॉक' सिन पहायला मिळतील.
हेही वाचा: कंगनाच्या ताफ्यात आली महागडी Mercedes Maybach, किंमत ऐकून उंचावतील भुवया
जेव्हा विजय समंथाच्या 'सैम जैम ऑन' या शो मध्ये गेला होता तेव्हा तो म्हणाला होता की,''मी आतापर्यंत समंथासोबत कधीच लीप-लॉक सीन दिला नाही''. आता 'कुशी' सिनेमातून विजयनं ती हौस भागवली की काय असं म्हटलं जात आहे. बोललं तर असंही जातंय की,केवळ लीपलॉक सीन नाही तर काही इंटिमेट सीनही या दोघांचे या सिनेमात पहायला मिळतील. गेल्या आठवड्यात समंथा आणि विजय दोघांनी आपल्या चाहत्यांसोबत सिनेमाच्या सेटवरचे गाणं शूट करतानाचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. शिवाय गाण्याच्या शूटिंगचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यामध्ये विजय-समंथा सिनेमाच्या टायटल ट्रॅकवर रोमॅंटिक होताना दिसले आहेत.
समंथा आणि विजयच्या क्युट जोडीला पडद्यावर एकत्र पहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या सिनेमात समंथा आणि विजय व्यतिरिक्त जयाराम,सचिन खेडेकर,मुरली शर्मा,लक्ष्मी अशा अनेक कलाकारांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. २३ डिसेंबरला हा सिनेमा तेलुगु,तामिळ,कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Web Title: Samantha Ruth Prabhu Vijay Deverakonda Have Lip Lock And Intimate Scenes In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..