RRKPK Box Office Weekend Collection: तीन दिवसात हाफ सेंच्यूरी!'रॉकी और राणी की प्रेम कहानी' बॉक्स ऑफिसवर पडतोय पैशांचा पाऊस

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची मुख्य भुमिका असलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
Rocky aur Rani Kii Prem Kahaani box office day 3 collection
Rocky aur Rani Kii Prem Kahaani box office day 3 collectionEsakal

Rocky aur Rani Kii Prem Kahaani box office day 3 collection: करण जोहर दिग्दर्शित आणि आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची मुख्य भुमिका असलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील आलिया अन् रणवीरच्या कहाणीला प्रेक्षकांची खुप पसंती मिळत आहे. ही रोमँटिक जोडी सध्या चर्चेतही आहे. त्यामुळे चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्यासाठी नेटकऱ्यांची गर्दी होत आहे.

Rocky aur Rani Kii Prem Kahaani box office day 3 collection
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: मराठमोळ्या क्षिती जोगचं दिग्दर्शक करण जोहरने केलं कौतुक, म्हणाला..

या चित्रपटाला 11.50 कोटींची तगडी ओपनिंग मिळाली. ही कमाई पहिल्या दिवसाची असल्याने यात विकेंडला चांगली वाढ होईल असा अंदाज निर्मात्यांनी व्यक्त केला होता आणि आता या चित्रपटाला रिलिज होऊन तीन दिवस झाले आहे. आता या चित्रपटाच्या विकेंडच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

Rocky aur Rani Kii Prem Kahaani box office day 3 collection
Ranveer Deepika Video: कसा वाटला मग सिनेमा? दीपिका करतेय नवऱ्याच्या 'रॉकी और राणी की प्रेम कहानी'चं प्रमोशन

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने रविवारी म्हणजेच रिलीजच्या तिसर्‍या दिवशी किती कमाई केली आणि विकेंडची कमाई किती झाली हे जाणुन घेऊया..

वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली. जगभरात या चित्रपटाने 50 कोटींचा आकडा पार केला आहे. शुक्रवारी 11 कोटींसह ओपनिंग देणाऱ्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने शनिवारी जवळपास 16.05 कोटींचा व्यवसाय केला.

तर सकनिल्‍कच्‍या सुरुवातीच्या आकड्यानुसार, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ने रिलीजच्‍या तिसर्‍या दिवशी म्हणजेच रविवारी 19 कोटीं रुपयांच्या जवळपास ग्रँड कलेक्‍शन केलं.

त्यामुळे आता या चित्रपटाची विकेंडची कमाई 46.33 कोटींवर गेली आहे. तर तीन दिवसांत चित्रपटाने जगभरात 50 कोटींची कमाई पूर्ण केली आहे

Rocky aur Rani Kii Prem Kahaani box office day 3 collection
Gashmeer Mahajani: वडीलांच्या मृत्यूनंतर मराठी कलाकरांनी सपोर्ट केला का? गश्मीर म्हणतोय, 'फक्त समजूतदार लोकच..'

46 कोटींचा वीकेंड कलेक्शन असलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने भारतात अद्याप 50 कोटींचा टप्पा ओलांडला नसला तरी हा चित्रपट लवकरच जगभरात 100 कोटींची कमाई करेल असा विश्वास निर्माते आणि चाहत्यांना आहे.

या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्याशिवाय धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, आमिर बशीर, तोता रॉय चौधरी, चुर्णी गांगुली, क्षिती जोग आणि अंजली आनंद यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com