रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमात रणवीर सिंह आणि जॅकलीन फर्नांडिस ही जोडी झळकणार?

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 15 October 2020

सिंबा आणि सुर्यवंशीनंतर आता तिस-यांदा रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगची जोडी एकत्र काम करणार आहे.

मुंबई- दिग्दर्शक रोहित शेट्टीने अभिनेता अजय देवगणनंतर बॉलीवूडचा मोस्ट एनर्जिटीक अभिनेता रंणवीर सिंहवर जास्त विश्वास दाखवलेला दिसतोय. 'सिंबा' आणि 'सुर्यवंशी'नंतर आता तिस-यांदा रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगची जोडी एकत्र काम करणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी १९८२ मध्ये रिलीज झालेल्या 'अंगुर' सिनेमाचा रिमेक बनवणार असल्याचं कळतंय. या रिमेकला मॉर्डन टच देत रोहित काहीतरी भन्नाट करणार असल्याचं कळतंय.

हे ही वाचा: इजिप्त सिने जगताचा आधारस्तंभ हरपला, अभिनेते महमूद यासिन यांच निधन  

'अंगुर' या सिनेमाचा रिमेकची गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चा आहे. याच्याशीच संबंधित आता एक नवीन माहिती समोर येतेय. या सिनेमात अभिनेता रणवीर सिंहसोबत हॉट आणि डॅशिंग अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला कास्ट केल्याचं कळतंय. निर्मात्यांना या सिनेमासाठी रणवीरसोबत जॅकलीनचीच जोडी हवी असल्याची चर्चा आहे. आता 'सुर्यवंशी' सिनेमाचं काम पूर्ण झालं आहे त्यामुळे रोहित शेट्टी 'अंगुर' सिनेमाच्या रिमेकवर काम करण्याची तयारी करतोय.

सुत्रांच्या माहितीनुसार, लॉकडाऊन दरम्यान रोहितने या सिनेमावर बरचसं काम केलं आहे आणि आता स्टारकास्ट देखील फायनल केली आहे तेव्हा लवकरंच या सिनेमाच्या शूटींगला देखील सुरुवात होईल असं दिसतंय. 'अंगुर' या सिनेमाच्या रिमेक बाबतीत सांगायचं झालं तर रोहित शेट्टी यावर गेल्या ५ वर्षांपासून विचार करतोय. या सिनेमात सुरुवातीला शाहरुख खानला फायनल करणार असल्याचं म्हटलं जात होतं मात्र नंतर तारखा उपलब्ध नसल्याने शाहरुख या सिनेमावर काम करु शकला नाही.

आता रोहितने रणवीरवर विश्वास दाखवला आहे. यात रणवीरचा डबल रोल दिसणार आहे. तो  'अंगुर'मधील संजीव कुमारची भूमिका साकारणार आहे. निर्माते या सिनेमाला बॉलीवूडमधील सर्वात मोठा कॉमेडी सिनेमा असल्याचं म्हणत आहेत.    

rohit shetty angoor remake ranveer singh to work with jacqueline fernandez  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rohit shetty angoor remake ranveer singh to work with jacqueline fernandez