Cirkus Movie: गेल्या 10 वर्षातील सगळ्यात कमी ओपनिंग करणारा रोहित शेट्टीचा सिनेमा ठरला 'सर्कस'

रोहित शेट्टीच्या सर्कस सिनेमाची पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कमाईची तुलना त्याच्या इतर सिनेमांच्या फर्स्ट डे कलेक्शनसोबत केली जात आहे.
Rohit Shetty cirkusMovie first day opening in decade
Rohit Shetty cirkusMovie first day opening in decadeGoogle

Cirkus Movie: बॉलिवूडमधील सर्वाधिक हिट दिग्दर्शकांमध्ये गणला जाणारा रोहित शेट्टीचा 'सर्कस' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. रणवीर सिंग सारखा प्रसिद्ध स्टार मुख्य भूमिकेत होता तरीही चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. 'सर्कस' चित्रपटाचे आतापर्यंतचे कलेक्शन पहाता असे दिसून येते आहे की शेट्टीच्या हिट रेकॉर्डला खीळ बसणार आहे. (Rohit Shetty cirkusMovie first day opening in decade)

Rohit Shetty cirkusMovie first day opening in decade
Cirkus Movie: बॉक्सऑफिसवर पहिल्याच दिवशी रणवीरच्या 'सर्कस'नं टाकली मान..आता मेकर्सला आणखी एक मोठा झटका..

'सिम्बा', सिंघम, गोलमाल , चेन्नई एक्सप्रेस अशा हिट चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा रोहीत शेट्टी यांच्या 'सर्कस' चित्रपटाने लोकांची निराशा केली आहे. 'गोलमाल' फ्रँचायझी, 'बोल बच्चन' आणि 'ऑल द बेस्ट' सारखे हाय-ऑक्टेन कॉमेडी सिनेमे बनवणाऱ्या रोहितने 'सर्कस'सोबत कॉमेडीही आणली पण यावेळस ही कॉमेडी प्रेक्षकांना आवडली नाही असे दिसून येते आहे. इतकेच नव्हेतर रोहित शेट्टीच्या चित्रपटांच्या ट्रेलरलाही जसा धमाल प्रतिसाद मिळतो तसा प्रतिसाद या 'सर्कस'च्या ट्रेलरला मिळाला नाही. येथूनच 'सर्कस'चा खेळ गडबडला.

असे दिसून येते की रोहित शेट्टीच्या सिनेमाची ही गेल्या 10 वर्षांतील सर्वात छोटी ओपनिंग आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर, त्याच्या चित्रपटांचे ओपनिंग कलेक्शन 2010-11 मध्ये 8 कोटींच्या आसपास होते. 2010 मध्ये आलेल्या त्याच्या 'गोलमाल 3' या चित्रपटाला 8 कोटींची ओपनिंग मिळाली होती आणि 2011 मध्ये 'सिंघम'ने पहिल्या दिवशी 8.94 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2012 मध्ये रोहितच्या 'बोल बच्चन'ला 12.10 कोटींची ओपनिंग मिळाली होती.'चेन्नई एक्सप्रेस'ने कमाल करत 33 कोटी पार केले होते. पण सर्कस'ची कमाई या पेक्षा कमी आहे. जर चित्रपटाला प्रतिसाद नाही मिळाला तर त्याची चित्रपट गृहातून लवकर हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com