Lockdown- दिग्दर्शक रोहित शेट्टीची फोटोग्राफर्सना मदत, अकाऊंटमध्ये केले पैसे ट्रान्स्फर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

मनोरंजन क्षेत्रातील फोटोग्राफर्सकडे सध्या सगळंच बंद असल्याने काही काम नाहीये... अश्या फोटोग्राफर्सच्या मदतीसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक- निर्माता रोहित शेट्टी पुढे आला आहे.

मुंबई-  कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे.  कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता या कठीण परिस्थितीशी लढण्यासाठी अनेक कलाकार मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. बॉलिवूड कलाकारांबरोबर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत पुढे आले.  लॉकडाऊनमुळे सगळ्याच कंपन्या बंद आहेत. त्यामुळे कलाक्षेत्रात काम करणाऱ्या विविध कामगारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यासाठी अनेक कलाकार पुढे आले आहेत. या पडद्यामागील कलाकारांमध्ये मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टाईल, स्पॉटबॉय आदींचा समावेश येतो. यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील फोटोग्राफर्स ही येतात. सध्या सगळच बंद असल्याने या फोटोग्राफर्सकडेही काम नाही आहे. अश्या फोटोग्राफर्सच्या मदतीसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक- निर्माता रोहित शेट्टी पुढे आला आहे.

हे ही वाचा: बहीण कृष्णा श्रॉफने पुन्हा शेअर केले बिकनीमधील फोटो.. मग टायगरने दिली अशी प्रतिक्रिया..

रोहित शेट्टी या फोटोग्राफर्सच्या अकाउंट्समध्ये पैसे ट्रान्स्फर करत आहे. सध्या सगळच बंद असल्याने कलाकारही घराबाहेर पडत नाही आहेत. त्यामुळे फोटोग्राफर्सचे कामही बंद झाले आहे. त्यामुळे या कठीण परिस्थितीत रोहित त्यांना मदत करत आहे. मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध फोटोग्राफर योगेश शाह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रोहित शेट्टीचा एक फोटो शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत.

योगेश यांनी हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ' बॉलिवूड चे सर्वात आवडते दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी चित्रपटसृष्टीतील कामगारांना मदत केल्यानंतर आता ते मनोरंजन क्षेत्रातील फोटोग्राफर्ससाठी उभे राहिले आहेत. सध्याच्या कठीण परिस्थितीत ते मनोरंजन क्षेत्रातील फोटोग्राफर्सच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करत आहेत. त्यांची ही मदत नेहमीच लक्षात राहील.'

याआधी रोहितने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज' (FWICE) ला ५१ लाख रुपयांची मदत देखील केली होती.

rohit shetty sends money to film photographers account during lockdown


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rohit shetty sends money to film photographers account during lockdown