Rakhi Sawant: बाबो! राखी सावंतच्या आयुष्यावर चित्रपट.. ती स्वतः पोलिसाच्या भूमिकेत, आणि.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rowdy rakhi new film on rakhi sawant's life

Rakhi Sawant: बाबो! राखी सावंतच्या आयुष्यावर चित्रपट.. ती स्वतः पोलिसाच्या भूमिकेत, आणि..

Rakhi Sawant New Film Rowdy Rakhi : राखी सावंत हे नुसतं नाव ऐकलं तरी अनेकांचा थरकाप उडतो. बॉलीवुडमध्ये फारशी सक्रिय नसूनही सतत चर्चेत असणारी राखी सावंत कायमच काहीतरी नवीन धक्के द्यायला सोशल मीडियापुढे येत असते. मग कधी तिचे अफेअर असतो, लग्नाची चर्चा किंवा तिचा सुरू असलेला वेडेपणा.. राखी हे नाव कायमच वादग्रस्त राहिले आहे. पण आता मात्र राखीने एक वेगळाच धक्का दिला आहे.

'ड्रामा क्वीन' राखी सावंतच्या आईचे काही दिवासांपूर्वीच निधन झाले. त्यानंतर तिचा आणि आदिल खान याचा घटस्फोट झाला. सध्या हे प्रकरण चांगलेच गाजले आहे. राखीने आदिलवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. एकीकडे असे सगळे मुद्दे असतानाच, राखीच्या आयुष्यात एक आनंदाचा प्रसंग आला आहे.

रखीच्या आयुष्यावर चित्रपट येणार आहे. नुकतीच याबाबत माहिती समोर आली असून 'रावडी राखी' (Rowdy Rakhi) असे या चित्रपटाचे नाव आहे. या सिनेमात राखी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती राखीचा भाऊ राकेश करणार आहे. 

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत राकेश म्हणाला,'' 'राउडी राखी' हा सिनेमा मी करत असल्याचं वृत्त खरं आहे. राखी खरोखरच रावडी आहे. तिला त्रास देणाऱ्या लोकांना ती तिच्या पद्धतीने सरळ करते. राखीने तिचा पती आदिलला देखील चांगलाच धडा शिकवला आहे". 

'रावडी राखी' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. या सिनेमात राखी मुख्य भूमिकेत असण्यासोबत अनेक दिग्गज कलाकारदेखील आहेत. असरानी, मनोज जोशी, सयाजी शिंदे आणि अनु कपूर या कलाकारांची नावे समोर आली आहेत.

मात्र अद्याप राखीने कोणीतही माहिती दिलेली नाही. तसेच या सिनेमात राखीची भूमिका कोण साकारणार हेही समोर आलेलं नाही.