esakal | RRR Making : अजयचा जबरी परफॉर्मन्स,पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood actor ajay devgn rrr movie

RRR Making : अजयचा जबरी परफॉर्मन्स,पाहा व्हिडिओ

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - केवळ भारतीयच नाही तर जगभरातील प्रेक्षकांना आरआरआरच्या प्रदर्शनाचे वेध (RRR Making Video) लागले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार असा प्रश्न चाहत्यांनी निर्माते आणि दिग्दर्शकांना विचारला होता. त्यावर निर्मात्यांनी यंदाच्या वर्षी दिवाळीच्य़ा सुट्टीत चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे सांगितले होते. अद्याप कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नाही. चित्रपटगृहं बंद आहेत. अशावेळी मोठ्या पडद्यावर हा सिनेमा प्रदर्शित होणार किंवा नाही याचे उत्तर गुलदस्त्यात आहे. असे असले तरी या चित्रपटाच्या टीझरनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(( Rrr Making Video Ss Rajamoulis Bahubali With Action Packed Ajay Devgn Jr Ntr Ram Charan yst88)

सध्या आरआरआरमधील अजय (ajay devgn) आणि आलियाच्या (aailya bhatt) मेकिंग व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. एस एस राजामौली (ss rajamauli) हे बाहूबलीनंतर पुन्हा एकदा एक भव्य कलाकृती घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ज्याची सर्वांना उत्सुकता आहे. आरआरआरच्या मेकिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची सगळीकडे चर्चा आहे. त्यात ज्युनिअर नटराजन (jr ntr), रामचरण (ramcharan), अजय देवगण आणि आलिया भट यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळतो आहे.

आरआरआर मधील वेगवेगळ्या प्रसंगाचे चित्रिकरण अद्याप सुरु आहे. काही प्रसंगाचे चित्रिकरण झाले आहे. त्याचा हा मेकिंग व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरआरआर हा सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय असल्याचे दिसून आले आहे. त्याचे #KomaramBheemNTR या #SitaramarajuCharan या नावाचे हॅशटॅगही सुरु झाले आहेत. ऑक्टोबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. दिग्दर्शक राजामौली आणि निर्माते पेन मुव्हिजच्या वतीनं मेकिंग व्हिड़िओ व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेयर करताना असं लिहिलं आहे की, थिएटरमध्ये प्रेक्षक जेव्हा हा चित्रपट पाहण्यासाठी जातील तेव्हा त्यांना एकप्रकारचा अल्टीमेट एक्सपिरियन्स मिळावा. असा प्रयत्न आम्ही केला आहे.

हेही वाचा: यश आणि गौरीच्या साखरपुड्याची तयारी जोरात; पाहा व्हिडिओ

हेही वाचा: तापसी पन्नूची मोठी घोषणा; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात योगदान असणाऱ्या दोन वीरांची गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. मेकिंग व्हिडिओ हा प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असल्याचे दिग्दर्शकांच्यावतीनं सांगण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटामध्ये मुख्य भूमिका करणाऱ्या कलाकाराची झलक दाखविण्यात आली आहे.

loading image