RS Shivaji dies : प्रसिद्ध अभिनेते आर.एस. शिवाजी कालवश, साई पल्लवीच्या वडिलांची साकारलेली भूमिका ठरली लोकप्रिय

आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयामुळे लोकप्रिय झालेल्या आर एस शिवाजी यांचे निधन झाले आहे.
Actor RS Shivaji Tamil cinema :
Actor RS Shivaji Tamil cinema :esakal
Updated on

Actor RS Shivaji worked predominantly in Tamil cinema : ज्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीचा गार्गी नावाचा चित्रपट पाहिला असेल त्यांना आर एस शिवाजी कोण आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांनी गार्गीमध्ये साई पल्लवीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. आता आर एस शिवाजी यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयामुळे लोकप्रिय झालेल्या आर एस शिवाजी यांचे निधन झाले आहे. त्यांनी चैन्नईमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. ते ६६ वर्षांचे होते. तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये निर्माता, अभिनेता म्हणून त्यांनी वेगळी ओळख प्राप्त केली होती. त्यांच्या जाण्यानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली

प्रसिद्ध विनोदी अभिनेते म्हणून आर एस शिवाजी यांची वेगळी ओळख होती. त्यांचा चाहतावर्ग मोठा होता. चेन्नईमध्ये १९५६ साली जन्म झालेल्या आर एस शिवाजी यांनी प्रामुख्यानं तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये काम केले. त्यांनी प्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांच्यासोबत एक प्रॉडक्शन हाऊस देखील सुरु केले होते. त्याचे नाव राजकमल असे आहे. त्यांनी या प्रॉडक्शन हाऊससोबत वेगवेगळे प्रोजेक्टस करुन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

आर एस शिवाजी यांच्या निधनाची बातमी ऐकताच टॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. शिवाजी यांनी त्यांच्या चित्रपट कारकीर्दीमध्ये निर्माता, अभिनेता, सहाय्यक दिग्दर्शक, साउंड डिझाईन सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत आपल्या नावाचा ठसा उमटविला होता. प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी सोबत त्यांनी गार्गीमध्ये साकारलेली तिच्या वडिलांची भूमिका चाहत्यांना विशेष आवडली होती.

Actor RS Shivaji Tamil cinema :
Jawan Trailer: बादशाहचा दुबईत जलवा! जवानचा ट्रेलर झळकला बुर्ज खलिफावर; हजारो चाहत्यांची उपस्थिती...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com