Rubina Dilaik disappointed ,Big Boss 14 winner,Television Actressमी जाड झाली आहे म्हणून मला मेल करून,मेसेज करून खुप सुनावलं आहे.wife of Abhinav Shukla | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rubina Dilaik

रुबिना दिलैक लवकरच देणार गुडन्यूज!

रुबिना दिलैक(Rubina Dilaik) म्हणजे हिंदी टेलीव्हिजनमधला ओळखीचा चेहरा. छोटी बहु,शक्ती- अस्तित्व के एहसास की या मालिकांमुळे अभिनयक्षेत्रात आपली ओळख निर्माण करीत असतानाच रुबिनाकडे बिग बॉस १४ हा शो चालत आला. आणि मग काय,तिनं त्या संधीचं सोनं करीत या शोचे विजेतेपद आपल्याकडे खेचून आणले. खरं तर त्यावेळी तिच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. पण त्यावर लक्ष न देता ती आपला खेळ खेळत राहिली. या शो मध्ये तिचा नवरा अभिनव शुक्लाही तिच्यासोबत स्पर्धक म्हणून सामिल झाला होता. त्यावेळी या दोघांमध्ये बिनसलं होतं. पण स्वतः रुबिना आणि अभिनवने मान्य केलं की, आम्ही जर बिग बॉस शो मध्ये आलो नसतो तर आमचा नक्कीच घटस्फोट झाला असता.

हेही वाचा: सारा म्हणाली,''मला तो दोन्ही रुपात आवडतो"

बिग बॉसनंतर रुबिनाकडे भरपूर प्रोजेक्ट चालून येतील अशी जोरदार चर्चा होती. पण रुबिना मात्र सध्या कोणता मोठा प्रोजेक्ट करताना दिसून येत नाही. बरं,अगदीच सडपातळ असलेली रुबिना आता थोडी जाड झाल्याचंही दिसून येत आहे. रुबिनाच्या या वाढत्या वजनावर टीका करणारे मेल तिला गेलेले आहेत. तिला यावरनं नावं ठेवणारे काही घाणेरडे मेसेजही करण्यात आले आहेत. या सर्वांना रुबिनाने सोशल मीडियावर उत्तर देत खडे बोलही सुनावले आहे.

रुबिनाने एक ट्वीट केलंय ज्यात ती म्हणते,''तुम्ही मी जाड झाली आहे म्हणून मला मेल करून,मेसेज करून खुप सुनावलं आहे. तुमच्या म्हणण्यानुसार मी जाड झालेय, तर मी सडपातळ राहण्यासाठी काहीच मेहनत घेत नाही. मी चांगले कपडे घालून प्रेझेंटेबल राहत नाही,प्रोजेक्ट मिळविण्यासाठी कष्ट करीत नाही. असो,यावर मी काय बोलणार.

पण ज्यांनी मला हिणवलंय त्यांनी मला वेदना नक्कीच दिल्यात. तुम्ही माझ्या कामाविषयी नं बोलता नको त्या गोष्टीवर बोलून वेळ खर्च करीत आहात. पण माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. आणि मी एका चांगल्या फेजमध्ये आहे. तुम्ही जे माझी निंदा करताय ते सुद्धा माझ्या आयुष्यातली एक फेज आहात,ती निघून जाईल. मी माझ्या फॅन्सचा आदर करते. त्यामुळे कृपा करून तुम्ही स्वतःला माझे फॅन म्हणवून घेऊ नका. रुबिनाने पुढे नमूद केलंय की कोरोनातून बरे झाल्यानंतर माझं वजन वाढलं होतं. पण मी या सगळ्यावर मात करण्यात आणि पुन्हा माझ्या नियमित वजनावर परत येण्यासाठी प्रयत्न करतेय. मला यश येत आहे. त्यामुळे मी खूश आहे. आणि हीच 'गुडन्यूज' रुबिनाने दिली आहे.

loading image
go to top