Sara ali khan showes her love,video viral तुझ्या ह्या आठवणी मी जपल्या नसत्या तर माझ्या नजरेला दुःख आणि मनाला वेदना नक्कीच झाल्या असत्या. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sara ali khan

सारा म्हणाली,''मला तो दोन्ही रुपात आवडतो"

sakal_logo
By
प्रणाली मोरे

सारा अली खानची(Sara Ali Khan) ओळख ही केवळ सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी म्हणूनच आता उरली नाही तर बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्येही साराचं नाव आवर्जुन घेतलं जातं. तिच्या विनम्र स्वभावामुळेही तिने अनेकांची मनं जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वी तिच्या एका फॅनने तिला वडापाव ऑफर केला आणि तिने तो चक्क स्विकारत,फॅनला 'धन्यवादही' दिले. तिच्या फॅनने स्वतः सोशल मीडियावर तो व्हिडीओ शेअर करीत 'तिच्यावर खूप चांगले संस्कार झाले आहेत' या शब्दात तिचं कौतूक केलं. याव्यतिरिक्त सारा स्वतःही तिचे फॅमिली,फ्रेंड्स यांच्यासोबतचे,तिच्या हॉलिडेजचे तसंच फिटनेस संदर्भातले अनेक फोटो किंवा व्हिडिओ शेअर करीत असते.

हेही वाचा: अर्जून कपूर म्हणाला,''तू तर भारताची...''

नुकताच तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आतापर्यंत जिथे-जिथे फिरायला गेली आहे तिथले काही सुंदर निवडक फोटो एकत्रित करून त्याचा एक व्हिडीओ बनविला आहे. या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडला 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या सिनेमातील 'ख्वाबों के परिंदे' हे गाणं वाजत आहे. या व्हिडिओतील फोटोंचं वैशिष्टय म्हणजे हे सर्वच फोटो साराने सुर्योदय आणि सुर्यास्ताच्या वेळेस क्लीक केलेले आहेत. हिल्सवरून,नदीकिना-्यावरनं,बोटींग करताना हे सर्व फोटो क्लीक केल्यामुळे वेगवेगळ्या अॅंगलने दिसणारा सुर्योदय आणि सुर्यास्त आपल्याला त्या व्हिडीओवर खिळवून ठेवतो.

या व्हिडीओइतकंच लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे साराने या व्हिडीओवर लिहिलेली पोस्ट. खरंतर साराने यमक जुळवण्याचा चांगला प्रयत्न करीत ह्या पोस्टला थोडं कवितेचं रुप दिलं आहे. सारा म्हणतेय,''स्टेट ऑफ किंग्ज-सिटी ऑफ लेक्स. सुरज की किरनों मे सारा बेक्स,सनसेट सनराइज इतने फोटोज शी टेक्स,बट विदाऊट दीज मेमरीज ऑफ प्रिय सूर्य हर आइज हर्ट अॅन्ड हार्ट एस्...#सनसेट#सनराईज#सनकीस्स्#थ्रोबॅक....''असं या पोस्टच्या माध्यमातनं सारा व्यक्त झाली आहे. या ओळींतनं सारा जणू म्हणतेय, "या सुर्याच्या किरणांमुळे मला थोडे चटके बसत असले तरी मला सुर्याच्या या सुंदर रुपाला कॅमे-्यात बंदिस्त करण्याचा मोह आवरत नाही. तो त्याच्या दोन्ही रुपात म्हणजे उगवताना आणि मावळताना दोन्ही वेळेस तितकाच मोहक दिसतोय. हे प्रिय सूर्य,तुझ्या ह्या आठवणी मी जपल्या नसत्या तर माझ्या नजरेला दुःख आणि मनाला वेदना नक्कीच झाल्या असत्या. आज मी खूप खूश आहे.''

सारा आपल्याला कुली नं १ या सिनेमात दिसली होती. आता ती अक्षयकुमार आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' या सिनेमात दिसणार आहे.

loading image
go to top