राहुल्याची एण्ट्री आता रुपेरी पडद्यावर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 July 2019

अभिनेता राहुल मगदूमला खरी प्रसिद्धी मिळाली ती "झी मराठी' वाहिनीवरील "लागीर झालं जी' या मालिकेमुळे. छोट्या पडद्यावर अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता तो लवकरच रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.

मुंबई : अभिनेता राहुल मगदूमला खरी प्रसिद्धी मिळाली ती "झी मराठी' वाहिनीवरील "लागीर झालं जी' या मालिकेमुळे. छोट्या पडद्यावर अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता तो लवकरच रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.

"पळशीची पीटी' या मराठी चित्रपटात तो विकास शिंगाडे या हवालदाराची मुख्य भूमिका साकारणार आहे. ग्रामीण शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन धोडिंबा बाळू कारंडे यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rukhul Mugdum get Frist Film