Polina Menshikh: लाईव्ह परफॉर्मन्स सुरु असताना स्फोट होऊन प्रसिद्ध अभिनेत्रीचा दुर्देवी मृत्यू

युक्रेन - रशिया युद्धात एका अभिनेत्रीला तिचा जीव गमवावा लागला आहे
Russian actress Polina Menshikh killed on stage during live show
Russian actress Polina Menshikh killed on stage during live show SAKAL
Updated on

Polina Menshikh Death News: सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. या युद्धात एका अभिनेत्रीला तिचा जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

रशियन लष्करी सुट्टीच्या निमित्ताने कार्यक्रम सादर करणारी अभिनेत्री पोलिना मेनशिख हिचा युक्रेनियन हल्ल्यात मृत्यू झाला.

रशियन-व्याप्त युक्रेनियन प्रदेशातील डान्स हॉलमध्ये 19 नोव्हेंबर रोजी रशियन लष्करी सुट्टी साजरी करण्यासाठी अभिनेत्री एक कार्यक्रम करत होती. या हल्ल्यात अचानक स्फोट झाल्याने ती जखमी झाली आणि नंतर तिचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.

Russian actress Polina Menshikh killed on stage during live show
Jhimma 2: सातासमुद्रापार झिम्मा २ बघायला आलाय खास पाहूणा, हेमंत ढोमे म्हणतो.. त्याला आपली भाषा

लाईव्ह हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यादरम्यान मेनशिख रशियन सैनिकांसाठी परफॉर्म करत होती. या हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री स्टेजवर गाताना आणि गिटार वाजवताना दिसत आहे. त्याचवेळी स्फोट होतो आणि हॉलचे दिवे विझतात. या हल्ल्यात जखमी झालेल्या मेनशिखचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला.

बीबीसीच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या लष्करी प्रवक्त्याने या हल्ल्याच्या मीडिया रिपोर्टिंगला दुजोरा दिला. अभिनेत्रीशी संबंधित सेंट पीटर्सबर्ग-आधारित थिएटर स्टुडिओ पोर्टलने अहवाल दिला की तिने पूर्वी दिग्दर्शित केलेल्या नाटकाचा आगामी परफॉर्मन्स तिच्या स्मृतीस समर्पित केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com