सनी लिओनची भुमिका करणार 'ही' युवती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ असे वेब सिरिजचे नाव आहे.

अभिनेत्री सनी लिओन लवकरच एका वेब सिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण ती या वेब सिरिज मध्ये स्वतः काम करणार नाहीये तर सनीची तारुण्यावस्थेतील भूमिका साकारण्यासाठी रिसा सौजानी हिची निवड करण्यात आली आहे.

ही एक बायोपिक वेब सिरिज असेल. ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ असे वेब सिरिजचे नाव आहे. अडल्ट सिनेमा ते बॉलिवूडची बेबी डॉल बनण्यापर्यंत सनीला खडतर प्रवास करावा लागला आहे. तिच्या आयुष्यातील काही महत्वाचे प्रसंग आणि हा प्रवास या वेब सिरिजमधून प्रकाशझोतात येणार आहे.

बिग बॉस या वादग्रस्त रिअॅलिटी शोमुळे भारतात सनी लिओन हे नाव प्रसिध्द झाले. ज्यानंतर ‘जिस्म २’ मधून तिने चित्रपटविश्वात प्रवेश केला. तेव्हापासून सुरु झालेला तिचा हा प्रवास अद्यापही सुरुच आहे. आता मात्र सनीचा असा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. सनीने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिचा आणि रिसाचा फोटो पोस्ट करुन 'लहानपणीची मी' असे लिहिले आहे. 
 

 

 

GUILTY!!! Of doing it my way!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rysa Saujani Who Will Play The Younger Version Of Bollywood Actress Sunny Leone