'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ला 'बाहुबली'काराचा सलाम

गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

आमीर खानने 'ठग्स'चे ट्रेलर ट्विटरवरही शेअर केले. ''ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाचे तेलगुल भाषेतील ट्रेलर प्रदर्शित करण्याचा बहुमान मला मिळाला. अमिताभ बच्चन व आमीर खान यांना एकत्रित बघणे ही पर्वणी असेल. 'ठग्स'च्या सर्व टीमला शुभेच्छा!' अशा शुभेच्छा राजमौली यांनी ट्विटरवरून दिल्या.

बहुप्रतिक्षीत 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. 30 लाखांच्या आसपास या ट्रेलरला व्ह्यूज मिळाले आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरवरून 'ठग्स'ची भव्यदिव्यता लक्षात येते. तसेच अमिताभ बच्चन, आमीर खान, फातिमा सना शेख, कतरिना कैफ यांसारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात बघायला मिळेल. चित्रपटाच्या व्यक्तिरेखांवरून व सेटवरून चित्रपटाची तुलना 'पायरेट्स ऑफ कॅरेबियन' व 'बाहुबली'शी होत असतानाच बाहुबलीचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनीही ट्रेलरवचे कौतुकत केले आहे.

आमीर खानने 'ठग्स'चे ट्रेलर ट्विटरवरही शेअर केले. ''ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाचे तेलगुल भाषेतील ट्रेलर प्रदर्शित करण्याचा बहुमान मला मिळाला. अमिताभ बच्चन व आमीर खान यांना एकत्रित बघणे ही पर्वणी असेल. 'ठग्स'च्या सर्व टीमला शुभेच्छा!' अशा शुभेच्छा राजमौली यांनी ट्विटरवरून दिल्या.

सुप्रसिद्ध तमिळ अभिनेते कमल हसन यांनीही 'ठग्स'चे कौतुक करत ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.      

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: s s rajamouli appreciates thugs of hindosthan trailer