Mohammad Nazim Khilji Father Passes Away:
Mohammad Nazim Khilji Father Passes Away:Esakal

Mohammad Nazim: 'साथ निभाना साथिया' फेम अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर! नाझिमच्या वडिलांचे निधन

'साथ निभाना साथिया' या मालिकेतील 'अहम मोदी' ची भुमिका साकारणारा ​​अभिनेता मोहम्मद नाझिम खिलजीच्या वडिलांचे निधन झाले आहे.
Published on

Mohammad Nazim Khilji Father Passes Away: प्रसिद्ध टीव्ही मालिका 'साथ निभाना साथिया'मध्ये अहम मोदी ही भुमिका साकारून प्रसिद्ध झालेला अभिनेता मोहम्मद नाझिम खिलजी याच्या बाबात एक वाईट बातमी समोर आली आहे.

अभिनेता मोहम्मद नाजिम यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नाजिमच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे.

 Mohammad Nazim Khilji Father Passes Away:
In Raahon Mein: अरिजितच्या जादुई आवाजात सजलंय 'इन राहों में'! 'द आर्चीज'मधील गाणं ऐकाच

नाझिमने त्याच्या वडिलांसोबत आणि संपूर्ण कुटुंबासोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. वडिलांच्या निधनाने नाझीम खूप दु:खी झाला आहे. त्यांच्या निधनाने नाझीमच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे. त्याचे चाहतेही नाझीमचे सांत्वन करत आहेत. वडिलांसोबतचे हे फोटो शेअर करताना त्याने एक भावनिक नोटही लिहिली आहे.

मोहम्मद नाझिमने लिहिले- "काल दुपारी माझ्या वडिलांचे निधन झाले. माझ्या आयुष्यातील दुसरा सर्वात वेदनादायक दिवस होता. त्यांना जाताना पाहणे हे खुप वेदनादायी होते. मक्का, सौदी, उमराह येथे काही दिवसांनी मी त्यांच्यासोबत जायचे ठरवले होते. मात्र आम्ही नाही जाऊ शकलो.

 Mohammad Nazim Khilji Father Passes Away:
Vir Das Landing On OTT: 20 देशांना हरवत एमी पुरस्कार जिंकणारा वीर दास आहे तरी कोण? विनिंग कॉमेडी सिरिज कोणत्या OTT वर येणार पाहता?

मी आज माझ्या आई-वडिलांशिवाय दु:खी आणि निराश झालो आहे आणि मला वाटतेय की, जर मी वेळ परत पुन्हा मागे आणू शकलो असतो तर … मला माहित आहे की माझे आई वडिल माझ्यावर लक्ष ठेवून आहेत आणि मी जगातील सर्वात भाग्यवान मुलगा आहे. मी तुम्हा दोघांना भेटलो. तुमच्या प्रार्थनेत लक्षात ठेवा"

 Mohammad Nazim Khilji Father Passes Away:
Kantara 2 : 'कांतारा २' येणार, प्रिक्वेलबाबत मोठी बातमी आली समोर! 'सालार' सोबत आहे खास कनेक्शन

सध्या नाझीमचे चाहते या पोस्टला कमेंट करत त्याला धीर देत आहे. नाझिमने 'साथ निभाना साथिया', उडान, तेरा मेरा साथ रहे, रूप: मर्द का नया स्वरूप आणि बहू बेगम यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. तो सोशल मिडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. तो फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेयर करत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com