Saba Azad Birthday: हृतिक-सबाच्या फोटोवर अभिनेत्याची एक्स-वाईफ सुझैनची कमेंट चर्चेत; म्हणाली,'देव...' Hrithik Roshan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saba Azad celebrates birthday with bettrhalf hrithik roshan sussanne khan comment

Saba Azad Birthday: हृतिक-सबाच्या फोटोवर अभिनेत्याची एक्स-वाईफ सुझैनची कमेंट चर्चेत; म्हणाली,'देव...'

Saba Azad Birthday: प्रसिद्ध गायिका सबा आझाद हिनं १ नोव्हेंबर रोजी आपला वाढदिस साजरा केला. सबानं बॉयफ्रेंड हृतिक रोशनसोबत आपला वाढदिवस कसा साजरा केला याची झलकही आपल्या चाहत्यांना दाखवली. आपल्या इन्स्टाग्रामवर सबानं एक व्हिडीओ शेअर केला,ज्यात तिनं वाढदिवसा दिवशीच्या खास क्षणांना शेअर केलं आहे.(Saba Azad celebrates birthday with bettrhalf hrithik roshan sussanne khan comment)

हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

हेही वाचा: Sai Tamhankar: 'त्याला पाहिलं की सईच्या डोळ्यात दिसते चमक?', क्रांती रेडकरनं उघडं केलं सईचं पितळ

व्हिडीओमध्ये हृतिक आणि तिचे अनेक फोटो दिसत आहेत. ज्यात जीममध्ये वर्क आऊट करण्यापासून ते डान्स शिकण्यापर्यंत ते अगदी गवतावर दोघे पहुडल्यापर्यंतचे आणि केक कटिंगचे सगळे फोटो शेअर करण्यात आले आहेत. फोटोचा मोंटाज शेअर करत सबा आझादनं लिहिलं आहे की,''मला माझ्या वाढदिवशी शांत रहायला आवडतं. अनेकदा मला तुम्ही दैनंदिन घरातल्या गोष्टी करण्यात रमलेलं पहाल, मला माहित नाही हे मी केव्हापासून माझ्या वाढदिवशी करायला शिकले पण हे सगळं मला खूप आवडतं करायला आता. मला चुकीचं समजू नका पण मला वेळ मिळाला की वाढदिवसाची पार्टी साजरी करायला देखील आवडेल. पण तो एक दिवस वाढदिवसाआधी पार्टीचं नियोजन करायला मिळायला हवा''.

सबानं पोस्ट करत पुढे लिहिलं आहे,''माझा वाढदिवस माझ्यासाठी खूप खास असतो,ज्यादिवशी मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात,शरीराचं चांगलं पोषण करायला मला त्यादिवशी अधिक आवडतं,माझ्या मानसिक शांततेसाठी मी त्या दिवशी वेळ काढते, यादिवशी मी माझ्या जवळच्या खास लोकांसोबत वेळ घालवते ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करते''.

सबानं आपला वाढदिवस खास बनवण्यासाठी हृतिकचे देखील आभार मानले. ती म्हणाली, ''आजचा दिवस प्लॅन करुन माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. मला शुभेच्छा देण्यासाठी,फुलांचा गुच्छ ज्यांनी घरी पाठवला आहे त्या सगळ्यांना धन्यवाद. माझ्या घरात अचानक वसंत ऋतुत जशी बाग फुलते तसं वातावरण दिसू लागलं आहे''.

हेही वाचा: Subodh Bhave Post: महाराजांना शेवटचं पाहून स्वतः ला संपवणार होता, पण 'हर हर महादेव'मुळे बदलला निर्णय

जसा सबानं व्हिडीओ शेअर केला तसं त्याच्यावर तिच्या मित्रपरिवारातून आणि चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला आहे. एका चाहतीनं लिहिलं आहे, 'मी तुझ्यावर जळते..पण तुम्हा दोघांना एकत्र पाहून खूप आनंद होतोय'. चाहत्यांच्या कमेंटपेक्षा सबा-हृतिकच्या व्हिडीओ पोस्टवर लक्ष वेधून घेतेय ती हृतिकची एक्स-वाईफ सुझैन खाननं दिलेली कमेंट. सुझैननं लिहिलं आहे,''देव तुम्हा दोघांवर आशीर्वादाचा वर्षाव करो...''