'सॅक्रेड गेम्स'फेम ही अभिनेत्री आहे प्रेग्नंट!

वृत्तसंस्था
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

सॅक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनमध्ये ज्या अभिनेत्रीने बात्याची भूमिका करून प्रेक्षकांना वेडं केलं ती आता प्रेग्नंट आहे.

मुंबई : सॅक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनमध्ये ज्या अभिनेत्रीने बात्याची भूमिका करून प्रेक्षकांना वेडं केलं ती आता प्रेग्नंट आहे. सॅक्रेड गेम्सनंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही, त्याच कारण हेच होतं. सॅक्रेडमधली हीच बात्या अर्थात कल्की कोचलीन पाच महिन्यांची गरोदर आहे. म्हणून ती सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.

सॅक्रेड गेम्सचा दिग्दर्शक अनुराग कश्यपपासून कल्कीने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर ती इस्त्रायली पियानोवादक गाय हर्षबर्ग याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार कल्की वॉटर बर्थ पद्धतीने बाळाला जन्म देणार आहे. या दोघांनी लग्न केलेले नसून लग्नापूर्वीच ती बाळाला जन्म देईल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Guy, girl and sushi mania

A post shared by Kalki (@kalkikanmani) on

कल्कीने सांगितले की, 'मला आतापासूनचे शरिरात होणार बदल जाणवत आहेत. आता मी माझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घ्यायला लागले आहे. कामंही कमी केली आहेत. पण प्रेग्नंसीमुळे मला अत्यंत उर्जादायी वाटतंय. मला आणखी काम करायचं आहे, मात्र त्यापेक्षा सध्या स्वतःकडे लक्ष देणं गरजेटं आहे, असं मला वाटतं.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

The preoccupations of an actor right before a scene... #behindthescenes #BHRAM @zee5premium #ZEE5 Photo by @vikas_photoholic

A post shared by Kalki (@kalkikanmani) on

कल्कीने 2011 मध्ये अनुराग कश्यपशी लग्न केलं होतं. पण ते फार काळ टिकू शकलं नाही. 2015 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला व वेगळे झाले. यापूर्वी वॉटर बर्थ पद्धतीने अभिनेत्री ब्रुना अब्दुल्लाह हिनेही बाळाला जन्म दिला होता.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sacred games fame kalki kochlin is pregnant