Sacred Games 2 : 'भगवान किसको मानता है?'

टीम ईसकाळ
मंगळवार, 30 जुलै 2019

"सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजचा दुसरा भाग येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर या वेबसीरिजबाबत उत्सुकता वाढली होती. आता या सीरिजचा नवा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

"सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजचा दुसरा भाग येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर या वेबसीरिजबाबत उत्सुकता वाढली होती. आता या सीरिजचा नवा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

'भगवान को मानते हो? पर कभी सोचा है भगवान किसको मानता है?' असा गायतोंडेचा मोनोलॉग या टीझरमध्ये घेण्यात आला आहे. 

गणेश गायतोंडे आणि सरताज सिंग म्हणजेच नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान पुन्हा एकमेकांसमोर येणार आहेत. गायतोंडे, सरताज, बंटी, दिलबाग यांच्याभोवती फिरणारी ही कथा या दुसऱ्या भागात नवं वळण घेणार आहे.

"सेक्रेड गेम्स'मधील संवाद प्रचंड हिट ठरले होते. आता या दुसऱ्या भागात काय नवीन पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sacred games teaser 2 released