Sadabhau Khot on Sunil Shetty: जागतिक भिकारी...; टॉमेटोच्या किंमतीवर बोलणाऱ्या सुनील शेट्टीवर सदाभाऊ खोत भडकले

जागतिक भिकारी म्हणत सदाभाऊ खोत यांनी सुनिल शेट्टीला सुनावलं आहे.
sadabhau khot angry on suniel shetty statement on tomato price increase
sadabhau khot angry on suniel shetty statement on tomato price increase SAKAL

Sadabhau Khot on Suniel Shetty News: गेल्या काही दिवसांपासुन टोमॅटो भाववाढ चांगलीच चर्चेत आहे. टोमॅटो भाववाढीवरुन अनेक कलाकार भाष्य करत आहेत. अशातच सुनिल शेट्टीने टोमॅटो भाववाढीवर काही दिवसांपुर्वी वक्तव्य केलं होतं. ज्याची खुप चर्चा झाली.

पण आता शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी सुनिल शेट्टी अण्णाच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. जागतिक भिकारी म्हणत सदाभाऊ खोत यांनी सुनिल शेट्टीला सुनावलं आहे.

(sadabhau khot angry on suniel shetty statement on tomato price increase)

sadabhau khot angry on suniel shetty statement on tomato price increase
Baipan Bhaari Deva: बाईपण भारी देवा आणि राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरेंचं खास कनेक्शन, एकदा वाचा

सुरुवातीला सदाभाऊ खोतांनी सुनिल शेट्टीचं विधान सांगीतलं... आजकाल मी टोमॅटो कमीच खातो लोकांना वाटले की मी सुपरस्टार असल्याने या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण हे खोटे आहे, आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते - सुनील शेट्टी

या विधानावर सदाभाऊ खोत म्हणाले.. जागतिक भिकारी सुनील अण्णा शेट्टी जर कटोरा घेऊन दारी आला तर टमाटू वाढग माई.. म्हणजेच जर सुनिल कटोरा घेवुन तुमच्या दारी भीक मागायला आला तर त्याला टोमॅटो भीक म्हणुन दे गं बाई असं विधान सदाभाऊ खोतांनी केलंय.

काय म्हणाला होता सुनिल शेट्टी?

सुनील शेट्टी यांनी टोमॅटोच्या दराबाबत आता वक्तव्य केले आहे. सुनील शेट्टी म्हणाला की, 'माझी बायको घरी फक्त दोन दिवस पुरेल इतकाच भाजीपाला आणते.

ताज्या भाज्या खाण्यावरच आम्ही भर देतो. मात्र, आजकाल टोमॅटोच्या किमती वाढत आहेत, त्याचा परिणाम आपल्या घराच्या स्वयंपाकघरावरही होत आहे. आजकाल मी टोमॅटो कमी खायला सुरुवात केली आहे.

असं होऊ शकतं की, लोकांना वाटेल की, तो सुपरस्टार आहे त्यामुळे महागाईचा त्याच्यावर काय परिणाम होईल. पण तसं काही नाही. आम्ही देखील या सगळ्या गोष्टींमधून आम्हीही जातो.'

sadabhau khot angry on suniel shetty statement on tomato price increase
Hollywood Strike: पहिल्यांदात असं घडतंय.. हॉलीवुडमध्ये अभिनेते - लेखक संपावर, हे आहे मोठं कारण

 पावसाळा सुरु होताच पालेभाज्यांचे भाव वाढतात. हे अगदी सहाजिक आहे. मात्र गेल्या काही दिवासांपासून टोमॅटोचे दर मात्र गगनाला भिडले आहे. देशभरात टोमॅटोचे दर असून यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसली आहे.

अनेक भागांमध्ये टोमॅटोच्या किंमती 150 रूपये किलोंपेक्षा जास्त झाल्या आहेत. त्यामुळे गृहणींनी त्याच्या किचनमध्ये टोमॅटोचा वापर कमी केला आहे.

काही दिवसांत टोमॅटोचे भाव कमी होतील अशी अपेक्षा होती. परंतु भाव चढेच आहेत. यामुळे सर्वसामान्य माणसांना फटका बसलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com