"मीडियम स्पाइसी'ला  सागर देशमुखचा तडका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

अभिनेता सागर देशमुख आता मोहित टाकळकर यांच्या "मीडियम स्पाइसी' चित्रपटामध्ये दिसणार आहे.

अभिनेता सागर देशमुख याने आपल्या दमदार अभिनयाने "भाई- व्यक्ती की वल्ली', "हंटर' अशा चित्रपटातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. सागर आता मोहित टाकळकर यांच्या "मीडियम स्पाइसी' चित्रपटामध्ये दिसणार आहे. "हंटर', "वाय झेड' आणि "गर्लफ्रेंड'नंतर सागरचा सईसोबत हा चौथा चित्रपट आहे. 

याबद्दल निर्मात्या विधी कासलीवाल म्हणाल्या, ""सागर हा आमच्या चित्रपटाचा भाग असून याचा आम्हाला आनंद आहे. या चित्रपटात अनेक मनोरंजक व्यक्तिरेखा असून सागरची व्यक्तिरेखा या कथेचा एक अविभाज्य भाग आहे.

पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारल्यानंतर सागर सध्या डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारत आहे. "मीडियम स्पाइसी' या चित्रपटात शहरी जीवनातील नातेसंबंधांवर भाष्य केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sagar Deshmukh in New Role