सागरिका खेळणार 'फुटबॉल'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

शाहरूखच्या "चक दे इंडिया'मधून बॉलीवूडमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी सागरिका घाटगे तिच्या मागील "इरादा' चित्रपटानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे.

सागरिका, मिलिंद उके यांच्या आगामी "मॉन्सून फुटबॉल' या चित्रपटातून ती रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाची कथा गृहिणींच्या विषयावर आधारित आहे. काही गृहिणी एकत्र येऊन त्यांची एक फुटबॉल टीम तयार करतात, अशी या चित्रपटाची कथा असणार आहे.

"चक दे'मधून एका हॉकी खेळाडूच्या भूमिकेसाठी सागरिकाचे खूप कौतुक झाले होते. याविषयी सागरिका म्हणाली, "चक दे इंडियानंतर मला पुन्हा खेळाशी संबंधित एक चित्रपट करायचाच होता. आता पुन्हा मला ही संधी मिळाली आहे. माझे शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्ये झाले असल्याने लहानपणापासूनच मला अनेक खेळ खेळायची आवड आहे आणि ते येतातही. पण मी फुटबॉल फार खेळले नाहीय. एक खेळाडू म्हणून आता फुटबॉलचे ट्रेनिंग मी पुन्हा सुरू करण्यास उत्सुक आहे.' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sagarika ghadage in new movie monsoon football