पश्याचा साखरपुडा : अभिनेता आकाश नलावडेची नुकतीचं पार पडली Engagement

स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार मालिक फेम पश्या म्हणजेच आकाश नलावडेचा नुकताचं पार पडला साखरपुडा
sahkutumb sahaparivar pasha fame Akash Nalawade engagement
sahkutumb sahaparivar pasha fame Akash Nalawade engagementesakal

स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील अप्लावधीतच प्रसिद्ध झालेली मालिका सहकुटुंब सहपरिवार मालिक सध्या एका वेगळ्या ट्रकवर आहे. त्यातील एक सगळ्यांचा आवडता कलाकार म्हणजे अंजीचा पश्या. त्याने अजुनही अंजीला आपल्या प्रेमाची कबुली दिली नसली तरी खऱ्या आयुष्यातील अंजी म्हणजेच रुचिका धुरीला आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. इतकेच नव्हे तर दोघांचा नुकतांच साखरपुडा पार पडला आहे. सध्या त्याचे फोटो व्हायरल होत आहे.

आकाश नलावडेचा नुकताचं रुचिका धुरीसोबत साखरपुडा पार पडला. त्याच्या आनंदाच्या क्षणी मालिकेतील काही कलाकार साक्षीदार ठरले आहेत. रुचिका धुरीने त्यांच्या साखरपुड्याचे काही फोटो व्हिडीओ आपल्या इंस्टा स्टोरीवर शेअर केले आहेत.

यापूर्वीही रुचिकाने पश्या म्हणजेच आकाश नलावडेसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

आकाश पुण्यामधील मध्यमवर्गीय परिवारातील मुलगा. शाळा-कॉलेजपासूनच त्याला अभिनयाची आवड होती. हळूहळू नाटक, एकांकिका, सिनेमे याबद्दल त्याला अधिक उत्सुकता वाटू लागली. मग स्वतः अभ्यास करून, वेगवेगळे प्रयोग करून त्यानं अभिनयकौशल्य आत्मसात केलं.

कॉलेजमधून नाटक, एकांकिका केल्यानंतर आता अभिनयातच करिअर करायचे असं त्याने ठरवलं आणि पुण्याच्या ललित कला केंद्र येथे प्रवेश मिळवला.

आर्थिक अडचण तर होतीच परंतु जिद्द त्यापेक्षा अधिक होती. त्यामुळे घरच्यांना विश्वासात घेऊन त्यानं अभिनयप्रवासाला सुरुवात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com