Sai Pallavi Wedding Photo: साउथच्या साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न? फोटो व्हायरल

Sai Pallavi Wedding Photo Viral
Sai Pallavi Wedding Photo ViralEsakal
Updated on

Sai Pallavi Wedding Photo Viral: साउथ अभिनेत्री साई पल्लवी ही नेहमीच चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाही. ती सोशल मीडियावर कमी सक्रिय असली तरी तिच्या पोस्टची चर्चा होत असते. साई आपल्या साधेपणासाठी आणि उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. मात्र आता साई पल्लवीनं गुपचूप लग्न केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

Sai Pallavi Wedding Photo Viral
Disha Patani : अंबानींच्या गणरायाचे दर्शन घ्यायला गेली, पण 'दिशा' भरकटली! साडीमुळे झाली ट्रोल

साईचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती वधुच्या वेशात आहे. त्यामुळे तिने लग्न केल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत.

चित्रपट दिग्दर्शक राजकुमार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यात तिच्यासोबत सहकलाकार शिवकार्तिकेयन दिसत आहे.

दोघांच्या गळ्यात हार आहे. त्यामुळे त्यांनी लग्न केलं असं बोललं जात होतं. मात्र हा फोटो त्यांच्या लग्नाचा नाही तर एका चित्रपटाच्या लॉन्चिंग इव्हेंटचा असल्याचं समोर आलं आहे.

Sai Pallavi Wedding Photo Viral
Soma Laishram: प्रसिद्ध मणिपुरी अभिनेत्रीच्या चित्रपट अन् कार्यक्रमांवर 3 वर्षांसाठी बंदी! कारण..
Sai Pallavi Wedding Photo Viral
Jaane Jaa Song: प्रसिद्ध गायक आतिफ अस्लमला मोठा धक्का, अनंतनाग मधील दहशतवाही हल्ल्यानंतर आता....

लग्नाच्या अफवा पसरल्यानंतर दिग्दर्शक राजकुमार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. हा फोटो चित्रपटाच्या कार्यक्रमादरम्यानचा आहे. साउथमध्ये चित्रपट लाँच झाला की अशाप्रकारचा हार कलाकारांना घालतात. त्यामुळे अशा अफवा पसरवू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. या फोटोंना चुकिचं कॅप्शन देत सोशल मीडियावर व्हायरल केलं जात आहे. साईने लग्न केलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com