आईस्क्रीम भात कुणी खात का? सई ताम्हणकरला आहेत या विचित्र सवयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sai tamhankar birthday actress sai tamhankar eats ice cream and rice

आईस्क्रीम भात कुणी खात का? सई ताम्हणकरला आहेत या विचित्र सवयी

मराठीसोबतच हिंदीमध्येही आपल्या अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर(Sai Tamhankar). मराठीतली बोल्ड,ग्लॅमरस अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जातं. केवळ मराठीच नाही तर हिन्दीतही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. सई सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. शिवाय आपले विचार निर्भीड पणे मांडत असते. अशा सईचा आज २५ जून रोजी वाढदिवस. सईच्या आयुष्यात अशी एक गोष्ट आहे जी ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. तिच्या जेवणाच्या सवयी काहीशा वेगळ्याच आहेत.

हेही वाचा: 'आय लव्ह उद्धव..' महाराष्ट्राच्या राजकारणावर काय म्हणले लकी अली..

सई ताम्हणकर कायमच चर्चेत असते. या शिवाय सतत विविध कलाकृतींमधून झळकत असते. सध्या तिच्या 'मीडियम स्पायसी' (Medium Spicy) सिनेमाची आणि बेरोजगार या वेबसिरिजची चर्चा आहे. या दोन्हीही कलाकृती प्रेक्षकांना भावल्या आहेत. 'मिडियम स्पायसी' या चित्रपटात सई शेफच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात जरी सईने वेगवगेळे पदार्थ बनवले असले तरी खऱ्या आयुष्यातही ती उत्तम स्वयंपाक करते. जितका सुंदर ती स्वयंपाक करते त्याहून तिच्या खाण्याच्या आवडी भयंकर आहेत. आपल्याला विश्वास बसणार नाही पण सई चक्क गरम भातावर वरण घालण्याऐवजी थंडगार आईसक्रीम घालून खाते. अशाच काही विचित्र सवई तिला आहेत. (sai tamhankar birthday actress sai tamhankar eats ice cream and rice)

सईला वेगवेगळे पदार्थ, त्यातही काहीतरी प्रयोग करून खायला आवडतात. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती स्वत: दुधातलं पिठलं करते. दुसरं काॅम्बिनेशन म्हणजे पुरणपोळी, तूप आणि सोबत व्हॅनिला आइस्क्रीम ही देखील तिला खायला आवडतं. तिच्या 'गर्लफ्रेंड' सिनेमातही ती 'आइस्क्रीम-भात' असं कॉम्बिनेशन खाताना दिसली होती. लोकांना ही विचित्र वाटले पण ही तिची स्वतःची सवय आहे असं तिने नंतर उघड केलं. ती म्हणाली होती, 'मी अनेक अशक्य काॅम्बिनेशन्स ट्राय करते. पण भात आणि आइस्क्रीम एकत्र खायला मला आवडतं. पण ते आइस्क्रीम मँगो आइस्क्रीमच हवं. म्हणजे ते जास्त चवदार लागतं.'

Web Title: Sai Tamhankar Birthday Actress Sai Tamhankar Eats Ice Cream And Rice

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..