esakal | पाय फ्रॅक्चर असूनही सई ताम्हणकरचं काम सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Tamhankar leg fracture at Mimi movie shooting

शूटींग दरम्यान सईचा अपघात झाला व त्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तिचा पाय फ्रॅक्चर असूनही तिने शूटींग सुरू ठेवले आहे. 'मला आई व्हायचंय' या चित्रपटाचा हिंदी रिमेक मिमी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

पाय फ्रॅक्चर असूनही सई ताम्हणकरचं काम सुरूच

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका विशेष चित्रपटासाठी सध्या मेहनत घेत आहे.  ती राजस्थानमधील मांडवा येथे 'मिमी' या हिंदी चित्रपटाच्या शूटींगसाठी गेली आहे. मात्र, शूटींग दरम्यान तिचा अपघात झाला व त्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तिचा पाय फ्रॅक्चर असूनही तिने शूटींग सुरू ठेवले आहे. 'मला आई व्हायचंय' या चित्रपटाचा हिंदी रिमेक मिमी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

हाताची सर्जरी होताच 'हा' अभिनेता थेट रुग्णालयातून निघाला पत्रकार परिषदेसाठी

चित्रीकरणादरम्यान सईच्या पायाला मार लागला तरीही तिने चित्रपटाचे चित्रीकरण न थांबवता केले आहे. "जेव्हा माझा पाय फ्रॅक्‍चर आहे हे मला कळलं तेव्हा खरं तर मी खूप घाबरले होते. सगळ्यात आधी मला माझ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाची चिंता होती. परंतु मी चित्रीकरण थांबवले नाही. ते फ्रॅक्‍चर घेऊन मी माझे सिन्स पूर्ण करत आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने मला खूप आधार दिला,' असे सई सांगते.

'मी ब्राह्मण नसूनही मला...'; तेजश्री प्रधान म्हणते...

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर सई हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवत आहे. ती "हंटर' आणि "लव्ह सोनिया' या हिंदी चित्रपटात झळकली होती. यामधून तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच ती बॉलीवूड अभिनेत्री क्रीती सेननची मुख्य भूमिका असलेल्या "मिमी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तिच्या अश्लिल उद्योग मित्रमंडळ या चित्रपटाचीही जोरदार चर्चा होत आहे.