सैफ अली खान आणि अर्जुन कपूर पहिल्यांदाच एकत्र झळकणार, हॉरर कॉमेडी सिनेमात दिसणार दोघांचा अनोखा अंदाज

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 1 September 2020

हॉरर कॉमेडी असा हा सिनेमा असणार आहे. पवन कृपलानी या सिनेमावर काम करत आहेत. इतकंच नाही तर 'भूत पोलिस' हा सिनेमा थ्रीडीमध्ये तयार केला जाणार असल्याचंही म्हटलं जातंय.  

मुंबई- सैफ अली खान आणि अर्जुन कपूर पहिल्यांदाच सिनेमात एकत्र झळकणार आहेत. 'भूत पोलिस' असं या सिनेमाचं नाव आहे. हॉरर कॉमेडी असा हा सिनेमा असणार आहे. पवन कृपलानी या सिनेमावर काम करत आहेत. इतकंच नाही तर 'भूत पोलिस' हा सिनेमा थ्रीडीमध्ये तयार केला जाणार असल्याचंही म्हटलं जातंय.  

हे ही वाचा: सुशांतच्या स्टाफचे १४ जूनचे व्हॉट्सअप चॅट आले समोर, सुशांतनेही दिला होता रिप्लाय

रमेश तौरानी आणि अक्षय पुरी हे या सिनेमाची निर्मिती करत असून या सिनेमावर वर्षाच्या शेवटी काम सुरु केलं जाईल. या सिनेमात सैफ आणि अर्जुन घोस्ट हंटर्स म्हणजेच भूतांना पकडण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शक पवन कृपालानी यांच्या म्हणण्यानुसार, 'या सिनेमासाठी ही एकदम परफेक्ट जोडी आहे. आम्ही ही साहसी कॉमेडी करण्यासाठी फार उत्सुक आहोत. लवकरंच सैफ आणि अर्जुन आमच्या टीमला जॉईन करतील ज्यासाठी आम्ही खूप खुश आहोत. कारण हे दोघंही क्रेझी एंटरटेनर सिनेमासाठी एकदम परफेक्ट आहेत. दोघेही वेगळ्या अवतारात प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या स्क्रीप्टमध्ये त्यांच्या ट्रेडमार्क ह्युमरची देखील काळजी घेतली आहे.' विशेष म्हणजे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 

अभिनेता अर्जुन कपूरच्या सिनेमांबाबत सांगायचं झालं तर अर्जुन त्याच्या आगामी संदीप और पिंकी फरार या सिनेमात परिणीती चोप्रासोबत दिसून येणार आहे. यासोबतंच अर्जुन एका आगामी सिनेमात रकुल प्रीत सिंहसोबत देखील झळकणार आहे.   

saif ali khan and arjun kapoor are the lead actors for upcoming horror comedy film bhoot police  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saif ali khan and arjun kapoor are the lead actors for upcoming horror comedy film bhoot police