सैफ आणि करीनाची लव्हस्टोरी आहे खास,१२ वर्षांचं अंतर,पहिलं लग्न आणि दोन मुलं.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saif Ali Khan birthday :  saif and kareena kapoor lovestory

सैफ - करीनाची लव्हस्टोरी आहे खास,१२ वर्षांचं अंतर,पहिलं लग्न आणि दोन मुलं..

Saif Ali Khan birthday : बॉलीवुडचा 'नवाब' ,म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सैफ अली खान खऱ्या आयुष्यातही नवाब आहे. कोट्यावधीची संपत्ती असलेला हा अभिनेता बॉलीवुडमध्ये कायमच चर्चेत राहिला आहे. कधी आपल्या नावबी थाटामुळे, कधी चित्रपटांमुळे तर कधी कौटुंबिक कारणामुळे. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असे सैफचे (saif ali khan) आयुष्य आहे. सैफ सर्वाधिक चर्चेत राहिला तो त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे. २०१२ मध्ये त्याने वयाने लहान १२ वर्ष लहान असणाऱ्या करीना कपूरशी लग्नगाठ बांधली. आज त्यांचा संसार सुखाने चालला असून दोन मुलं आहे. पण हे घडलं कसं, तेच जाणून घेण्यासाठी पाहूया सैफ आणि करीनाची लव्हस्टोरी.. (Saif Ali Khan birthday : saif and kareena kapoor lovestory)

टशन या 2008 साली आलेल्या चित्रपटात अक्षय कुमार, सैफ अली खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या आधीही त्यांनी एकमेकांसोबत डेट केली होती परंतु या चित्रपटावेळी प्रेमाची खरी जाणीव झाली. सैफ करीनाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता ही त्याने तिच्या नावाचा थेट टॅटूच गोंदवून घेतला होता. त्याच्या हातावर करीनाचे नाव दिसले आणि माध्यमांना या प्रेमाची खबर मिळाली.

सैफने करीनाला प्रमोजही अत्यंत खास पद्धतीने केले होते. त्यावेळी सैफ करीनाला म्हणाला होता की, 'मी काही आता २५ वर्षांचा नाही जो तुला रोज रात्री घरी सोडायला येईन' एवढेच करून तो थांबला नाही तर त्याने करीनाच्या आईकडेच लग्नाचा प्रस्ताव पाठवला. सैफला आधीच एक बायको आणि दोन मुलं असल्याने या प्रेमाचं नेमकं काय होणार हे सांगणं कठीणच होतं पण करीनाच्या आईनेही या प्रेमाला होकार दिला.

सैफने करीनाला पहिल्यांदा एका बारमध्ये प्रपोज केले होते पण तेव्हा करीनाने नकार दिला. मग त्याने नोट्रे डेम चर्च येथे जाऊन तिला प्रपोज केले, तेचाही तिने नकार दिला. शेवटी त्याने करीनाला पॅरिसला घेऊन जायचं ठरवलं. कारण सैफच्या वडिलांनीही त्याच्या आईला म्हणजे शर्मिला टागोर यांना पॅरिसमध्ये जाऊनच प्रपोज केले. यावेळी त्याचे नशीब फळफळले आणि करीनाने सैफला होकार दिला. त्यानंतर ते दोघेही माध्यमांसमोरही एकत्र येऊ लागले आणि १६ ऑक्टोबर २०१२ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.

Web Title: Saif Ali Khan Birthday Saif And Kareena Kapoor Lovestory 12 Years Age Difference

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..