esakal | सीताहरणवर केलेल्या वक्तव्यामुळे सैफ अली खान अडचणीत, उत्तर प्रदेशमध्ये तक्रार दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

saif ali khan

उत्तर प्रदेशमधील एका वकिलाने सैफ अली खान आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.   

सीताहरणवर केलेल्या वक्तव्यामुळे सैफ अली खान अडचणीत, उत्तर प्रदेशमध्ये तक्रार दाखल

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- अभिनेता सैफ अली खान सध्या त्याने केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. त्याने सीताहरण आणि राम-रावण युद्ध यावर काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे वातावरण तापल्याचं लक्षात येताच त्याने माफी देखील मागितली होती. मात्र तरीही त्याच्या अडचणी काही कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. आता उत्तर प्रदेशमधील एका वकिलाने सैफ अली खान आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.   

बिग बॉस: राहुल वैद्यच्या धमाकेदार एंट्रीवर गर्लफ्रेंड दिशा परमारने दिली प्रतिक्रिया   

अभिनेता सैफ अली खान आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या विरोधात दाखल केलेली ही तक्रार उत्तर प्रदेश येथील जौनपुर जिल्ह्यातील अतिरिक्त मुख्य न्यायायलात आहे. वकिल हिमांशू श्रीवास्तव यांच्याकडून दाखल केलेल्या वादामध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला गेला आहे. कोर्टाने यावर २३ डिसेंबर ही तारीख सुनावणीसाठी दिली आहे.  

वकिल हिमांशू श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे की, त्यांचा सनातन धर्मावर विश्वास आहे. ग्रंथामध्ये श्रीराम हे चांगलं तर रावणाला वाईटाचं प्रतिक मानलं गेलं आहे. श्रीराम यांच्यावर आदिपुरुष हा सिनेमा बनवला जातोय ज्यामध्ये रावणाची भूमिका सैफ अली खान साकारतोय.

६ डिसेंबर रोजी सैफने एका मुलाखतीत सांगितलं होतं की रावण दयाळु होता. श्रीरामांचे भाऊ लक्ष्मण यांनी रावणाच्या बहीणीचं नाक कापलं होतं त्यामुळे रावणाने केलेलं युद्ध स्वाभाविक होतं आणि सीतेचं अपहरण देखील. सैफ अली खान यांचं हे वक्तव्य सनातन धर्मियांच्या श्रद्धेला ठेस पोहोचली आहे.

सैफच्या या वक्तव्यामुळे आदिपुरुषच्या मार्केटिंग टीमला मोठा धक्का बसला आहे. दिग्दर्शक ओम राऊत या सिनेमाची शूटींग अयोध्येत सुरु करणार होते आणि यासाठीच ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्यासाठी लखनऊ पर्यंत पोहोचले होते.   

saif ali khan controversial statement case filed in jaunpur district of uttar pradesh