esakal | तैमुरच्या भावाचं नाव ठरलंच! आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

saif, taimur, randhir kapoor

तैमुरच्या भावाचं नाव ठरलंच! आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री करीना कपूर खान Kareena Kapoor Khan आणि सैफ अली खान Saif Ali Khan हे आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. या दोघांनी जेव्हा पहिल्या मुलाचं नाव 'तैमुर' Taimur ठेवलं, तेव्हा सोशल मीडियावर मोठा वाद झाला होता. त्यामुळे आता दुसऱ्या मुलासाठी कोणत्या नावाचा विचार करणार याची चर्चा होती. अखेर आजोबा रणधीर कपूर यांनी माध्यमांना करीनाच्या दुसऱ्या बाळाचं नाव काय ठेवण्यात आलं, याचा खुलासा केला. 'करीना-सैफने त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव जे (Jeh)ठेवलंय', असं रणधीर कपूर 'ई टाइम्स'शी बोलताना म्हणाले. एका आठवड्याआधीच हे नाव निश्चित केल्याचं त्यांनी पुढे सांगितलं. (Saif Ali Khan Kareena Kapoors son named Jeh confirms Randhir Kapoor)

करीनाने २१ फेब्रुवारी रोजी चिमुकल्या पाहुण्याला जन्म दिला. करीनाने सोशल मीडियावर बाळाचे फोटो पोस्ट करतानाही विशेष काळजी घेतली आहे. कोणत्याही फोटोमध्ये तिने बाळाचा चेहरा दाखवलेला नाही. 'मदर्स डे'च्या निमित्ताने तिने सैफ, तैमुर आणि त्याच्या छोट्या भावाचा फोटो पोस्ट केला होता. मात्र यातही तिने बाळाचा चेहरा दिसणार नाही, याची काळजी घेतली होती.

हेही वाचा: सैफ- तैमुरची शेती, फोटो पाहिलेत?

सैफ व करीनाने २०१२ मध्ये लग्न केलं. 'टशन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. २० डिसेंबर २०१६ रोजी तैमुरचा जन्म झाला. दुसऱ्या बाळाच्या जन्माआधी सैफ व करीना नवीन घरात राहायला गेले. गरोदरपणादरम्यान करीना चित्रपटाचे शूटिंग, जाहिरातींसाठी काम करत होती. याशिवाय गरोदरपणातील योगसाधनेचं महत्त्वसुद्धा ती सोशल मीडियावरील पोस्टद्वारे पटवून देत होती.

loading image