esakal | सैफ अली खान 'होमी जहांगीर भाभांच्या' भूमिकेत

बोलून बातमी शोधा

saif ali khan play role of nuclear physicist homi bhabha
सैफ अली खान 'होमी जहांगीर भाभांच्या' भूमिकेत
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता सैफ अली खान हा त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. आता त्याच्या हाती एक वेगळी भूमिका आली आहे. तो त्याच्या आगामी एका प्रोजेक्टमध्ये भारतातील प्रसिध्द शास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांची भूमिका साकारणार आहे. अशी माहीती सुत्रांनी दिली आहे. पुढील काही दिवसांत सैफ अली खानचे भूत पोलिस, आदिपुरुष, विक्रम वेधा, बंटी - बबली २ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्याच्या या नव्या भूमिकेची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या एका माहितीनुसार देशाचे महान शास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांच्या मृत्युचे गुढ कायम आहे. अशावेळी त्यांच्यावर आधारित चित्रपटाच्या माध्यमातून त्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. ही एक बायोग्राफिकल मुव्ही असणार आहे. त्याचे दिग्दर्शन विक्रमजीत सिंह हे करणार आहेत. पिपिंगमूननं दिलेल्या माहितीनुसार सैफ अली खाननही या माहितीला दुजोरा दिला आहे. अणुशास्त्रज्ञ होमी भाभा यांचा मृत्यु त्यावेळी देशातील प्रत्येकाच्या चर्चेचा विषय झाला होता. अनेक उलट सुलट प्रतिक्रियांही व्य़क्त केल्या जात होत्या. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एक नवीन विषय हाताळला जाणार आहे.

त्या रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, रिलायन्स इंटरटेन्मेंटच्यावतीनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असून त्याचे नाव एसेनिशन ऑफ होमी भाभा असे ठेवण्यात आले आहे. विक्रमसिंग यांनी यापूर्वी रणबीर कपूर, जॅकलीन फर्नांडिझ आणि अर्जुन रामपाल यांची भूमिका असलेला रॉय हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.