esakal | सायरा बानू यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

saira banu

सायरा बानू यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

sakal_logo
By
स्वाती वेमूल

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू Saira Banu यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. रक्तदाब आणि शुगरच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. "सायराजी यांची प्रकृती ठीक असून त्या रुग्णालयातून घरी परतल्या आहेत. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद", अशी माहिती सायरा यांचे निकटवर्तीय फैसल फारुखी Faisal Farooqui यांनी 'पीटीआय'शी बोलताना दिली.

एंजिओग्राफीस दिला नकार

सायरा बानू यांच्यावर उपचार करणारे डॉ. नितीन गोखले म्हणाले, "त्यांचं लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल झालं आहे. यामुळे त्यांची एंजिओग्राफी करावी लागेल आणि त्यानंतर पुढील उपचार केले जातील." मात्र एंजिओग्राफी करण्यास सायरा यांनी डॉक्टरांना नकार दिल्याचं म्हटलं जात होतं.

७७ वर्षीय सायरा बानू या नैराश्यात असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. दिलीप कुमार यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या, त्यांच्या प्रत्येक सुखदु:खात सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी सायरा बानो यांच्यावर जुलै महिन्यात दु:खाचा डोंगरच कोसळला. ७ जुलै रोजी दिलीप कुमार यांचे निधन झाले. दिलीप कुमार यांच्या निधनाने सायरा बानो खूप खचल्या होत्या.

हेही वाचा: Money Heist 5: नेटकऱ्यांना दिसले विराट कोहली, बॉबी देओल; तुम्ही पाहिलंत का?

दिलीप कुमार आणि सायरा बानू यांचे निकटवर्तीय फैजल फारुखी म्हणाले, "दिलीप साहब यांच्या निधनानंतर सायरा बानू पूर्णपणे खचल्या आहेत. गेल्या ५५ वर्षांतील प्रत्येक क्षण त्यांनी दिलीप साहब यांच्यासोबत व्यतित केला होता. त्यामुळे त्यांच्या दु:खाची कल्पना आपण करू शकतो. त्यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे."

loading image
go to top