esakal | Saira Banu Health Updates: डॉक्टर लवकरच करणार एंजिओग्राफी
sakal

बोलून बातमी शोधा

Saira Banu Health Updates: डॉक्टर लवकरच करणार एंजिओग्राफी

Saira Banu Health Updates: डॉक्टर लवकरच करणार एंजिओग्राफी

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Saira Banu health updates ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांना रक्तदाबाशी संबंधित समस्येमुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बुधवारी अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. सायरा बानू यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी 'ई टाइम्स'शी बोलताना दिली. ७७ वर्षीय सायरा बानू यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्या कोरोनाबाधित नाहीत, मात्र कोरोनाच्या नियमांनुसार त्यांना स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहेत. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल

सायरा बानू यांच्यावर उपचार करणारे डॉ. नितीन गोखले म्हणाले, "त्यांचं लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल झालं आहे. यामुळे त्यांची एंजिओग्राफी करावी लागेल आणि त्यानंतर पुढील उपचार केले जातील."

एंजिओग्राफीसाठी डायबिटीजवर नियंत्रण आवश्यक

"सायरा बानू यांची एंजिओग्राफी नंतर केली जाईल. त्या पूर्णपणे बऱ्या होताच आधी त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. नंतर एंजिओग्राफीसाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल व्हावं लागेल. यासाठी त्यांनी डायबिटीजवर नियंत्रण आणणं खूप आवश्यक आहे", असं डॉक्टर पुढे म्हणाले.

हेही वाचा: "मर्यादेपलीकडे ट्रोलिंग सहन करणार नाही"; 'मोहित' नेटकऱ्यांवर भडकला

दिलीप कुमार यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या, त्यांच्या प्रत्येक सुखदु:खात सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी सायरा बानो यांच्यावर जुलै महिन्यात दु:खाचा डोंगरच कोसळला. ७ जुलै रोजी दिलीप कुमार यांचे निधन झाले. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी चाहत्यांसाठीही सर्वांत लोकप्रिय आहे. दिलीप कुमार यांच्या निधनाने सायरा बानो खूप खचल्या होत्या.

loading image
go to top