कोरोनाग्रस्तांसाठी साजिदचा पुढाकार, विश्वनाथन आनंद बरोबर 'बुध्दिबळ'

कोविडच्या काळात जे संकटात आहेत. त्यांना मदतीचा हात देणे हा त्यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
vishwanathan anand and sajid nadiawala
vishwanathan anand and sajid nadiawala Team esakal

मुंबई - कोरोनानं (corona) सर्वसामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रेटींना (celebrities) मोठ्या संकटात पाडलं आहे. अनेकांपुढे आर्थिक समस्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे त्या समस्येतून कसा मार्ग काढावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे.आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी आपल्या पुढे निर्माण झालेल्या आर्थिक प्रश्नांचा पाढा वाचला आहे. तर काहींनी कोरोनाग्रस्तांना मदतही केली आहे. सध्या प्रसिध्द निर्माता साजिद नाडियावाला (sajid nadiyawala) आणि विश्वविजेता विश्वनाथन आनंद (vishwanathan anand) यांच्या एका पोस्ट चर्चेत आली आहे. (sajid nadiadwala will play chess with champion vishwanathan anand for covid 19 fundraise)

बॉलीवुड निर्माता साजिद नाडियाडवाला, विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांच्यासोबत 13 जूनला यूट्यूबवर (you tube) एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये बुद्धिबळ खेळणार आहे. ज्याद्वारे कोरोनाच्या विनाशकारी दूस-या लाटेमध्ये सापडलेल्या गरजूंसाठी आर्थिक मदत उभी करता येईल. हे आयोजन अधिकाधिक लोकांनी गरजू व्यक्ती आणि परिवारांच्या मदतीसाठी पुढे यावे यासाठी करण्यात आले आहे.

कोविडच्या काळात जे संकटात आहेत. त्यांना मदतीचा हात देणे हा त्यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. आयोजकांनी आपल्या सोशल मीडियावर त्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले आहे की, आता प्रसिध्द निर्माता साजिद नाडियावाला हे आपल्या मदतीला येणार आहेत. ते पाचवेळा जगज्जेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदसोबत बुध्दिबळ खेळणार आहे.

vishwanathan anand and sajid nadiawala
फेसबुक लाइव्ह करताना अभिनेत्याने दिला आत्महत्येचा इशारा
vishwanathan anand and sajid nadiawala
Loki Released; प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली, सोशल मीडियावर चर्चा

बुध्दिबळ हा साजिद यांचा आवडता खेळ आहे. त्यांचे त्या खेळासाठीचे प्रेम आणि आवड सगळ्यांनाच माहित आहे, याचा उपयोग ते आता गरजवंतांसाठी करणार आहेत. चित्रपट निर्माते साजिद यांनी नुकतेच आपल्या ऑर्गनाइजेशन 'नाडियाडवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंट'च्या 500 हुन अधिक कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे लसीकरण अभियान चालवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com