पुण्यातील कॉन्सर्टसाठी उत्सुक!

sakal times summersault 2018 event vishal shekhar bollywood songs
sakal times summersault 2018 event vishal shekhar bollywood songs

येत्या शनिवारी (ता. २८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या कॉन्सर्टच्या निमित्ताने विशाल दादलानी आणि शेखर रावजियानी या धडाकेबाज जोडीबरोबर त्यांचा अनुभव, भारतीय संगीतातील बदलत्या घडामोडी असा अनेक विषयांवर अमृता प्रसादने संवाद साधला. 

प्रश्‍न - समरसॉल्ट कार्यक्रमात तुमची सादरीकरणाची रूपरेषा काय असेल?
विशाल, शेखर - आमचे हे पुण्यातले सादरीकरण भन्नाट, जोशपूर्ण असणार आहे. पुणेकर खूपच उत्साही आणि एनर्जेटिक आहेत. आमचा शो भव्य, जोशपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमची सगळी गाजलेली गाणी येथे सादर करूच, शिवाय नवीन गाणीही सादर करणार आहोत. आम्ही पुण्यातील या शोसाठी फार उत्सुक आहोत. 

प्रश्‍न - सनबर्न, एनएच विकेंडर, व्हीएच १ सुपरसॉनिक ७ यांसारख्या कार्यक्रमांतून अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार येथे येत आहेत. भारतीय संगीताच्या या बदलत्या चेहऱ्याबद्दल आपण काय सांगाल?
विशाल, शेखर -
 भारतीय संगीताचा चेहरामोहरा आता नक्कीच झपाट्याने बदलत आहे. आजच्या घडीला भारतात जवळपास ७० कार्यक्रम होत असतील; परंतु दशकांमागे गेलो, तर असा एकही कार्यक्रम होत नव्हता. हा वेगवान बदल आश्‍चर्यकारक आहे. बाहेरचे अनेक कलाकार येऊन येथे आपली कला सादर करतात. लोकही त्यांच्या जगभर गाजत असलेल्या गाण्यांचा आस्वाद घेतात. दर्जेदार अशा गाण्यांचा खजिनाच त्यांच्यासमोर उघडला जातोय.

प्रश्‍न - अनेक वर्षांपासूनच्या आपल्या संगीत प्रवासाबद्दल आणि बॉलिवूड संगीत व आपल्या स्वतंत्र गाण्याबद्दल तुम्ही दोघे काय सांगाल?
विशाल, शेखर -
 आम्ही अनेक वर्षांपासून संगीत देत असलो, तरी आम्हाला वाटते आम्ही नुकतीच सुरवात केली आहे. प्रत्येक दिवस आम्हाला नवीन काही शिकवणारा असतो. असे म्हणता येईल, की आम्ही फक्त बदल अनुभवत नाही, तर त्या बदलाचा भाग आहोत. बॉलिवूड हे सशक्त असे माध्यम आहे, जे जगाने प्रभावित होत नाही, तर जगाला प्रभावित करते. आता बॉलिवूड संगीत आणि स्वतंत्र वैयक्तिक संगीत यांचा विचार करता अनेक नवनवीन बदल घडत आहेत आणि ते निश्‍चित स्वागतार्ह, असे बदल आहे. पूर्वी भारतीय संगीतकार हा फक्त भारतीय संगीत द्यायचा आणि हॉलिवूड संगीतकार हा फक्त हॉलिवूड संगीत द्यायचा; पण आता त्यांच्यात असे काही भेद राहिले नाहीत. प्रत्येक जण स्वतंत्रपणे संगीत देऊ शकतो. हा संगीत क्षेत्रातील स्वागतार्ह बदल आहे. 

प्रश्‍न - इतक्‍या वर्षांपासून तुम्ही दोघे एकत्र काम करत आहात. तुमच्यात कधी कलानिर्मितीसंदर्भात मतभेद आले का?
विशाल, शेखर -
 लोक खरे तर आमच्यात मतभेद व्हायची वाट पाहतात; पण हे लोकांना समजत नाही, की वीस वर्षांपासून दोन लोक एकत्र काम करताय, तेव्हा ते आधी एकमेकांचे मित्र आहेत. आम्ही दोघे एकमेकांची कंपनी एन्जॉय करतो. आम्हाला एकमेकांच्या हुशारी आणि कामाबद्दल आदर आहे. हो, संगीताबाबत आमच्यामध्ये काही बाबतीत मतभिन्नता आहे. एक गाणे कसे असेल, याबाबत आम्ही अनेक वेगवेगळ्या दिशांनी विचार करत असतो. त्या वेळेस थोडीशी ओढाताण होते; परंतु गाणे सर्वोत्कृष्ट व्हावे, असाच आमचा प्रयत्न असतो. 

प्रश्‍न - तुम्ही दोघेही ‘रिॲलिटी शो’चा भाग होता. आताच्या जमान्यात कोणीही आपली कला यू-ट्यूबवर अपलोड करू शकतो तेव्हा या ‘रिॲलिटी शो’चा कला सादरीकरणात काय वाटा आहे?
विशाल, शेखर -
 ‘रिॲलिटी शो’चा महत्त्वाचा भाग म्हणजे ते शो, नवनवीन कलाकार शोधून काढतात. त्याच कलाकारांना यू-ट्यूबवर प्रसिद्ध होण्यासाठी वाट पाहावी लागते. ‘रिॲलिटी शो’मुळे कलाकार लाखो लोकांपर्यंत एका रात्रीत पोचू शकतो. हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. या दोन्हीचे कॉम्बिनेशन हे फार फायदेशीर आहे. एखादा कलाकार यू-ट्यूबवर प्रसिद्ध असेल, त्याचा मोठा चाहता वर्ग असेल, तर तो ‘रिॲलिटी शो’वर लवकर येऊ शकतो, असेच प्रकार सध्या घडत आहेत. 

प्रश्‍न - आज जवळपास प्रत्येक चित्रपटामध्ये रिमिक्‍स गाणी असते. तरुणवर्गाला या गाण्याची नव्याने ओळख होते, हे एक प्रकारे चांगलेच आहे. पण, या गाण्याच्या निर्मितीमागे प्रयोगशीलता दिसून येत नाही. तुमचे याबाबत काय मत आहे?
विशाल, शेखर -
 हा सगळा रिमिक्‍स प्रकार आम्हाला बोअर करतो. जे कोणी करतात, ते त्यांना आवडते; पण आमची इतकीच अपेक्षा आहे, की त्यांनी मूळ गीतकार, गायक आणि संगीतकारांना त्याचे श्रेय द्यायला हवे; परंतु असे घडताना दिसत नाही. तुम्ही बघाल अशी पुनर्निर्मिती केलेली अनेक गाणी आहेत. ज्यात तिच्या मूळ निर्मात्याला श्रेय दिले गेलेले नाही. ही अत्यंत लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. 

प्रश्‍न - एक संगीतकार, एक गायक म्हणून तुम्हाला जास्त काय आवडते, संगीत की गायन? 
विशाल, शेखर -
 ही एकच प्रक्रिया आहे. संगीत देणे आणि गाणे यामध्ये तसा फरक नाही. आम्ही हे दोन्ही करतो आणि त्याचा आनंदही घेतो. आमच्यासाठी या लाइव्ह शोची गुरुकिल्ली म्हणजे तुम्ही तुमच्या चाहत्यांना प्रत्यक्ष भेटू शकता आणि त्यांची ऊर्जा अनुभवू शकता. ‘लाइव्ह शो’मुळे तुम्ही आणि तुमचे चाहते यांच्यातील बंध अधिक घट्ट होतो. 

प्रश्‍न - शेखर तुझे ‘देवी’ हे गाणे महिलांना समर्पित होते. तशी अजून गाणी येणार का?
शेखर -
 माझ्या हृदयाच्या जवळ असणारे काही विषय आहेत. ‘देवी’ त्यातील एक आहे. माझे दुसरे प्रेम माझ्या देशाबद्दल आहे. मी स्वानंद किरकिरेबरोबर ‘माती’ या अल्बमवर सध्या काम करीत आहे. ज्यामध्ये आपल्या देशाबद्दलचे प्रेम, देशाची संस्कृती असे अनेक पैलू असणार आहेत.

सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८ 
शनिवार - २८ एप्रिल 
सहभाग - फरहान अख्तर, विशाल व शेखर 
रविवार - २९ एप्रिल 
सहभाग - मिका सिंग, बादशाह 
कुठे - शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे 
केव्हा - संध्याकाळी ६ वाजल्यापासून. 
ऑनलाइन बुकिंगसाठी -  bookmyshow.com  
अधिक माहितीसाठी संपर्क - ९०११०८५२५५ 

प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध 
-यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड), बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर (टिळक रस्ता), रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड) (सकाळी ९ ते ११.३०, सायंकाळी ५ ते रात्री ८) 

- ‘सकाळ’ बुधवार पेठ कार्यालय, शनिवारवाड्याजवळ (सकाळी ११ ते संध्याकाळी ६) 
- गिरिकंद ट्रॅव्हल्स, भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना (सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत) 

- लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रा. लि., मार्को प्लाझा, हिंजवडी शाखा व वर्ल्ड ट्रेड सेंटर, खराडी शाखा (सकाळी ११ ते सायंकाळी ५).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com