"सामना'मधील "सख्या रे' नव्याने रसिकांच्या भेटीला 

तेजल गावडे
सोमवार, 23 एप्रिल 2018

मुंबई : जुनी लोकप्रिय गाणी रिक्रिएट किंवा रिमिक्‍स करण्याचा बॉलीवूडमध्ये जणू काही ट्रेण्डच आला आहे. "लैला वो लैला', "एक दो तीन', "तम्मा तम्मा'...अशी कित्येक गाणी नव्याने विविध हिंदी चित्रपटात टाकण्यात आली आहेत. ती लोकप्रिय गाणी पुन्हा कॅश करण्याचा निर्मात्या व दिग्दर्शकांनी प्रयत्न केला. नव्या अंदाजात सादर झालेली ही गाणी रसिकांना चांगलीच भावली.

आता हाच ट्रेण्ड मराठी चित्रपटसृष्टीतही येत आहे. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जब्बार पटेल यांच्या "सामना' या चित्रपटात गायलेले "सख्या रे घायाळ मी हरिणी' हे गाणे आता "रणांगण' या मराठी चित्रपटात पुन्हा नव्याने पाहायला मिळणार आहे. 

52 विक्‍स एण्टरटेन्मेंट प्रस्तुत आणि ग्लोबल स्पोर्टस एण्टरटेन्मेंट मीडिया सोल्युशन्स (जीसिम्स) व हार्वे फिल्म्स निर्मित "रणांगण' हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, प्रार्थना बेहरे, मुक्ता बर्वे, संतोष जुवेकर, वैभव तत्ववादी हे कलाकार काम करीत आहेत. या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. त्यामध्ये "सख्या रे...' हे गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे.

मराठी चित्रपटातील एखादे लोकप्रिय गाणे रिक्रिएट करण्याचा हा बहुधा पहिलाच प्रयत्न आहे. हे गाणे खूप लोकप्रिय असल्यामुळे आता ते कशा पद्धतीने सादर केले जाणार आहे याबाबत उत्सुकता लागलेली आहे. याबाबत निर्माते कार्तिक निशानदार म्हणाले, की हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या गाणी रिक्रिएट व रिमेक होताना दिसतात. तरुण पिढीला लक्षात घेऊन गाणी नव्याने सादर करण्याचा सध्याचा ट्रेंड आहे. पण मराठी प्रेक्षक जागरूक असल्यामुळे गाणी रिक्रिएट करताना खूप मेहनत घ्यावी लागते. खूप विचार करून आम्हाला हे गाणे रिक्रिएट करावे लागलेले आहे. 

"रणांगण'मधील "सख्या रे...' गाण्याबद्दल सांगताना ते पुढे म्हणाले की, "सख्या रे...' गाणे रिक्रिएट करण्याचे खूप मोठे श्रेय राकेश सारंग व राहुल रानडे यांना जाते. कारण लतादीदींनी गायलेल्या गाण्याला रिक्रिएट करताना मराठी प्रेक्षकांच्या भावना जराही दुखावणार नाहीत, हे लक्षात घेऊन त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे. राहुल रानडे यांना जुनी गाणी व शास्त्रीय संगीताचे चांगले ज्ञान आहे. त्यांनी या गाण्याला योग्य न्याय दिला आहे व हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakhya re song remake in ranangan