Viral : लाईव्ह कॉन्सर्टमध्ये 'Lip Synch' करणं म्हणजे... संगीतकार सलील कुलकर्णींची नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 saleel kulkarni post

Viral : लाईव्ह कॉन्सर्टमध्ये 'Lip Synch' करणं म्हणजे... संगीतकार सलील कुलकर्णींची पोस्ट

Saleel Kulkarni Marathi Music Director: मराठी संगीत विश्वामध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या संगीतानं प्रेक्षकांना जिंकून घेणारे गायक संगीतकार सलील कुलकर्णी हे प्रसिद्ध सेलिब्रेटी आहे. त्यांच्या गाण्यांना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. कवी आणि गीतकार संदीप खरे यांच्यासोबत त्यांनी केलेल्या आयुष्यावर बोलू काही या संगीत कार्यक्रमाला मराठी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

सध्या सलील कुलकर्णी यांची एक पोस्ट सोशल मीडियावर लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यांनी लाईव्ह कॉन्सर्ट आणि त्या कार्यक्रमाचे होणारे व्हिडिओ शुटींग यावर नाराजी व्यक्त करणारी एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, लाईव्ह कॉन्सर्ट जाहीर रेकॉर्ड करुन लिप सिंक करणे म्हणजे जॉगिंगसाठी निघून कॅब करण्यासारखं आहे. अशामुळे सगळ्यांचीच फसवणूक.....त्यांच्या त्या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

हेही वाचा- बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

गेल्या काही दिवसांपासून एखाद्या लाईव्ह कॉन्सर्टचे शुट करुन त्यावरुन व्हिडिओ तयार करण्याचे आणि त्याचे रिल्स शेयर करण्याचे प्रमाण वाढते आहे. अशातच काही सेलिब्रेटी लाईव्ह कॉन्सर्टच्या नावाखाली प्रेक्षकांची फसवणूक करत असल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यावर कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमधून नाराजी व्यक्त केली आहे. कुलकर्णी यांच्या त्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत अशा प्रकारांवर सडकून टीका केली आहे.

saleel Kulkarni

saleel Kulkarni

हेही वाचा: Mahesh Manjrekar: 'वेडात मराठे वीर..' चित्रपटातील मावळ्यांची नावंच बदलली, नेसरीकरांचा संताप

लाईव्ह कॉन्सर्टच्या नावाखाली असे प्रकार होणं हे म्हणजे प्रेक्षकांची फसवणूक आहे. बऱ्याचदा प्रेक्षकांच्या लक्षात ती गोष्ट येत नाही. अशावेळी एखाद्या सेलिब्रेटीकडून तो प्रकार सुरुच राहतो. अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्यानं दिली आहे.

हेही वाचा: Har Har Mahadev: जितेंद्र आव्हाडांना दिग्दर्शकांचं जशास तसं उत्तर, 'मग आम्हाला...'