'Indian Idol'च्या वादावर सलीम मर्चंटचा खुलासा

निर्मात्यांच्या सांगण्यावरून स्पर्धकांची स्तुती करण्याच्या विषयावरून हा शो चर्चेत आला.
salim merchant
salim merchantfile image
Updated on

सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला शो म्हणजे इंडियन आयडॉल 12 (Indian Idol 12). शोमधील स्पर्धकांमुळे आणि परीक्षकांच्या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत. किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे हा शो चर्चेत आला होता. शोच्या निर्मात्यांनी त्यांना स्पर्धकांचे कौतुक करायला सांगितले होते, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता गायक सलिम मर्चंटने (Salim Merchant) या शोबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. इंडियन आयडॉल आणि द व्हॉईस ऑफ इंडिया या शोचे परीक्षण सलीम मर्चंटने केले होते. (salim merchant reacts to indian idol 12 he says was told to praise contestants on shows)

आर जे सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलीमला शोमधील निर्मात्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने सांगितले, 'होय, माझ्यासोबत देखील असे झाले आहे. पण खरे सांगायचे तर मी त्या शोच्या निर्मात्यांचे कधीच ऐकले नाही. मला वाटते मी त्यांचे ऐकले नाही म्हणूनच मी आज कोणत्याच शोचा परीक्षक नाहीये. मी कोणी तरी सांगितले म्हणून त्या स्पर्धकांचे कौतुक करत नाही. मी त्यांचे कौतुक करतो, कारण मी त्यांच्या चुका पाहण्यापेक्षा त्यांच्यामधील चांगले गुण पाहतो. जर मी त्या गायकांच्या चांगल्या गुणांचे कौतुक केले तर ते अजून चांगले काम करतील असे मला वाटते.'

पुढे सलीमने सांगितले, 'माझ्यासोबत असे अनेक वेळा झाले आहे की, शोच्या दिग्दर्शकाने मला सांगितले की कृपया तुम्ही नकारात्मक प्रतिक्रिया देऊ नका. पण मी हुशार आहे. मी शोच्या स्पर्धकांना नेहमी चुका सांगत होतो पण त्यासुद्धा चांगल्या पद्धतीने सांगत होतो.'

salim merchant
HBD निलेश साबळे: डॉक्टर ते अ‍ॅक्टर, विनोदवीराचा थक्क करणारा प्रवास

अमित कुमार यांनी केला होता खुलासा

काही दिवसांपुर्वी खास परीक्षक म्हणून गायक अमित कुमार यांना बोलवण्यात आले होते. त्या दरम्यान जे वक्तव्य केले त्यामुळे इंडियन आयडॉलबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अमित म्हणाले होते की, 'मी अजिबात तो शो एन्जॉय केला नाही. त्या एपिसोडमध्ये स्पर्धक कसेही गायले तरी त्यांचे कौतुक करावे लागले.'

salim merchant
'बालिका वधू' मालिकेच्या कमाईचं काय केलं?; अविकाचा व्हिडीओ व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com