Bharat : सलमान बनला रॉकस्टार; 'या' अभिनेत्रीची नव्या पोस्टरवर झलक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

आज 'भारत'चे आणखी एक नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. सलमान खानने हे पोस्टर त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवरुन शेअर केले आहे.

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान 'भारत' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काल (ता. 15) प्रदर्शित करण्यात आले. ज्यात सलमान खान एका वृध्दाच्या वेशात दिसत आहे. पोस्टरवर 2010 हे साल लिहीले आहे. 

आज 'भारत'चे एक आणखी नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. सलमान खानने हे पोस्टर त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवरुन शेअर केले आहे. या पोस्टर वर सलमान खान हा एका तरुणाच्या भूमिकेत दिसत आहे. तो एका रॉकस्टारच्या वेशात आहे. पोस्टरवर 1964 हे साल लिहीले आहे. दिशा पटानी या पोस्टरवर 'ट्रॅप्झे' आर्टिस्ट (फ्रेंच नृत्यशैली) म्हणून दिसत आहे. सलमानने हे पोस्टर शेअर करताना 'जवानी हमारी जानेमन थी' असे कॅप्शन दिले आहे. या चित्रपटात अभिनेत्री तब्बू, दिशा पटानी, सोनाली कुलकर्णी आणि जॅकी श्रॉफ यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट दक्षिण कोरियन चित्रपट 'ओडे टू माय फादर'चा रिमेक आहे. 

 

अली अब्बास जफर याने 'भारत'चे दिग्दर्शन केले आहे. 5 जून ला ईदच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटात सलमान सोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसेल.

Bharat : सलमानचा लूक पाहून सगळेच अवाक; 'भारत'चा पोस्टर रिलीज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman Khan aka Bharat shares a new poster with a glimpse of Disha Patani