सलमान आणि संजय सोबत 'या' चित्रपटात सामिल होणार आलियाचे नाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मार्च 2019

20 वर्षापूर्वी 'चल मेरे भाई' या चित्रपटात सलमान आणि संजय दत्त यांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर गेल्या 20 वर्षात चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले नाही. मात्र आता दिग्दर्शक संजय लीला भंन्साळी यांच्या नवीन चित्रपटानिमित्ताने ही जोडी बघायला मिळणार आहे.

बॉलिवूडचा दबंग खान आणि संजय दत्त ही 90 च्या दशकात गाजलेली जोडी लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. असे स्वतः सलमान खाननेच ट्विटमधून सांगितले आहे.

20 वर्षापूर्वी 'चल मेरे भाई' या चित्रपटात सलमान आणि संजय दत्त यांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर गेल्या 20 वर्षात चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले नाही. मात्र आता दिग्दर्शक संजय लीला भंन्साळी यांच्या नवीन चित्रपटानिमित्ताने ही जोडी बघायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सलमान आणि आलिया या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसतील. 

सलमान खानने ट्विट करत म्हटले आहे की, 'अखेर 20 वर्षांनंतर संजय आणि मी 'इन्शाअल्लाह' या चित्रपटात एकत्र येत आहोत याबद्दल मी खुप खूश आहे. आलिया भट सोबत काम करण्यासही मी उत्सुक आहे आणि हा प्रवास नक्कीच सुखावणारा असेल.'
 

 

तसेच आलिया भटनेही या चित्रपटाविषयी ट्विट केले आहे. आलिया म्हणते, 'संजय सर आणि सलमान खान हे एकत्र येत आहेत आणि मी या 'इन्शाअल्लाह' सुंदर प्रवासात त्यांच्या सोबत काम करण्यास उत्सुक आहे.' 

 

 

सलमान खान आणि संजय लीला भंन्साळी यांनी 1999 मध्ये 'हम दिल चुके सनम' चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर थेट आता नवीन चित्रपटात हे दोघे सोबत काम करतील. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman Khan and Sujay Dutt reunion for Sanjay Leela Bhansalis new film