सारा अली खानने धनुषसोबत केलं असं वर्कआऊट, व्हिडिओ झाला व्हायरल

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 28 November 2020

साराने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सारा वर्कआऊट करताना दिसतेय. या व्हिडिओची खासियत म्हणजे सारा अली खान सुपरस्टार धनुषसोबत वर्कआऊट करत घाम गाळतेय. 

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी 'कुली नंबर वन' या सिनेमामुळे चर्चेत आहे. सारा वरुण धवनसोबत या सिनेमात झळकणार आहे. सोशल मिडियावर सारा नेहमीच ऍक्टीव्ह असते. सोबतंच ती तिच्या फेिटनेसची देखील तितकीच काळजी घेते. नुकताच साराने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सारा वर्कआऊट करताना दिसतेय. या व्हिडिओची खासियत म्हणजे सारा अली खान सुपरस्टार धनुषसोबत वर्कआऊट करत घाम गाळतेय. 

हे ही वाचा: ड्रग केसमध्ये जामिन मिळाल्यानंतर सेटवर परतली भारती सिंह, पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट  

सारा अली खानने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलंय, 'ट्रेनिंग विथ थलायवा.' सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. सारा आणि धनुष जिममध्ये जिम ट्रेनरच्या देखरेखीखाली वर्कआऊट करत आहेत.  अतरंगी रे या सिनेमासाठी हे दोघं तयारी करत असल्याचं म्हटलं जातंय. 

सारा अली खान आणि वरुण धवनचा सिनेमा 'कुली नंबर १'चा ट्रेलर आज २८ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा सिनेमा २५ डिसेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा सारा आणि वरुण एकत्र मोठ्या पडद्यावर जोडी म्हणून झळकतील.

काही दिवसांपूर्वीच साराने कुली नंबर वनशी संबंधित एक पोस्ट देखील शेअर केली होती. ज्यामध्ये वरुण धवनचे वेगवेगळं कॅरेक्टर पाहायला मिळालं. तर दुसरीकडे सारा अली खान मराठमोळ्या लूकमध्ये दिसली होती. 'कुली नंबर १' व्यतिरिक्त सारा दिग्दर्शक आनंद एल राय यांचा आगामी सिनेमा 'अतरंगी रे'मध्ये दिसून येणार आहे. या सिनेमात सारासोबत अक्षय कुमार आणि धनुष आहेत.   

sara ali khan workout together in the gym with dhanush video viral  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sara ali khan workout together in the gym with dhanush video viral