

Salman Khan Bigg Boss OTT : बॉलिवूड स्टार सलमान खान याने मुंबईत बिग बॉस ओटीटी सीझन 2 लाँच केला. हा रिअॅलिटी शो 17 जूनपासून JioCinema वर पाहता येईल. सलमान खानने आता डिजिटलमध्ये पदार्पण केले आहे.
सुपरस्टार सलमान खान सध्या OTT रिअॅलिटी शो बिग बॉसच्या सीझन 2 मुळे खूप चर्चेत आहे. अशा परिस्थितीत आज म्हणजेच 16 जून रोजी बिग बॉस OTT 2 चा भव्य लाँच झाला. ज्यामध्ये सलमान खानने मीडियाशी संवाद साधला आणि अनेक गोष्टी शेअर केल्या. यादरम्यान सलमानने असेही सांगितले की, त्याचा एक मित्रही या शोमध्ये येणार आहे. (Salman Khan Bigg Boss OTT)
यादरम्यान सलमान खानने एक खुलासा देखील केला आहे, त्याला बिग बॉसशी संबंधित माहितीसाठी अनेक कॉल येतात, काहीजण या शोमध्ये सहभागी होण्याच्या उद्देशाने कॉल करतात आणि सलमान भाईने त्यांचे नाव पुढे करावे अशी त्यांची इच्छा आहे.
अभिनेता सलमान खान त्याच्या बिग बॉस ओटीटी 2 च्या लॉन्च इव्हेंटमध्ये त्याच्या दबंग अवतारात आला. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. बिग बॉस OTT 2 लाँच करण्यासाठी, सलमान खान व्हॅनिटी व्हॅनच्या छतावर चढून लोकेशनवर पोहोचला. यासाठी स्पेशन व्हॅनिटी व्हॅन सजवण्यात आली होती. व्हॅनवर एक मोठे आसन देखील ठेवण्यात आली होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.