अखेर सलमानने अमिताभजींसमोर दिली लग्नाची कबुली Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan with Sunil Grover

अखेर सलमानने अमिताभजींसमोर दिली लग्नाची कबुली

काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियातील रियाध शहरात 'द-बंग' हा शो पार पडला. यात सलमान खान(Salman Khan) हे मोठं आकर्षण होतंच पण त्याच्यासोबत शिल्पा शेट्टी,प्रभुदेवा,सई मांजरेकर,गुरु रंधवा,मनिष पॉल अशा अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. या शोला रियाधमध्ये मोठा प्रतिसाद लाभला. कोरोना काळातही लोकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून बॉलीवूडची क्रेझ दूरदूरपर्यंत पसरलीय याचा प्रत्यय प्रत्येकाला आला. यात सलमाननं त्याच्या अनेक गाण्यांवर परफॉर्मन्स दिला तर इतरही कलाकारांनी एकसे एक परफॉर्मन्स देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शो चं अॅंकरिंग मनीष पॉल ने केलं,त्याने नुकताच यु ट्युब वर शो च्या काही इंट्रेस्टिंग भागांना एकत्रित करून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक गोष्ट पाहून आश्चर्याचा धक्का नक्कीच आपल्याला लागेल.

याच 'द-बंग' शो मध्ये दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांनी सलमानला त्याच्या लग्नावरून छेडले आहे. आता सलमान अन् ऐश्वर्या प्रकरण ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की अमिताभ कशाला उगाच नको त्या भानगडीत पडतील. तर हो.बरोबर आहे तुमचं. हा प्रश्न अमिताभ यांच्या 'कौन बनेगा करोडपती'च्या शोची कॉपी करत,अमिताभ यांची मिमिक्री करणाऱ्या कॉमेडियन सुनिल ग्रोव्हरने सलमानला विचारला आहे.तो म्हणाला,''क्या हो जाता है शादी के नाम से आपको?ब्याह कर लिजिए''....आणि या प्रश्नावर सलमान चक्क लाजलेला पहायला मिळाला आहे. सध्या हा व्हिडीओ याच कारणामुळे जोरदार व्हायरल होत आहे. हो,तर लाजून का होईना पण सलमानने लग्नाविषयी सकारात्मक अंदाजात रिअॅक्शन दिली हे ही नसे थोडके. आता समोर अमिताभ यांच्या पेहरावात सुनिल ग्रोव्हर होता ही गोष्ट फार महत्त्वाची नाही. सलमान लग्नाच्या विषयावर लाजला हे आपल्यासारख्या सलमानच्या चाहत्यांसाठी महत्त्वाचे नाही का.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top